01:49pm | Nov 25, 2020 |
सातारा: राज्य शासनाने प्रार्थना/ धार्मिक स्थळे उघडण्यास मान्यता दिली आहे. आता ते स्थळे खुली झाली आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये गर्दी दिसत आहे ही गर्दी होणार नाही याची दक्षता देवस्थान प्रमुख, ट्रस्टने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
शासनाने धार्मिक स्थळे खुली केलेली आहेत, परंतु काही धार्मिक स्थळांमध्ये शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले जात नाही. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन धार्मिक स्थळांमध्ये येणार्या प्रत्येक भाविकाने मास्कचा वापर केला पाहिजे, गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन सुरक्षित अंतर राखले पाहिजे त्याचबरोबर धार्मिक स्थळाचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. धार्मिक स्थळांमधून कोरोना संसर्ग वाढू नये हा प्रशासनाचा हेतू आहे. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबंधित ट्रस्टची, तेथील प्रमुखांची असणार आहे तरी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टनी, प्रमुखांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
शाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे
राज्य शासनाच्या सुचनेनुसार दि. 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील 9, 10, 11 व 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील 10 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळले आहेत अशांना कामावर न येण्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. जे निगेटिव्ह आहेत असे शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी हजर झाले आहेत.
आता शाळा सुरु झाल्या आहेत विद्यार्थ्यांनीही शासनाने दिलेले नियम पाळले पाहिजे हे नियम आपल्या हिताचे असून यामध्ये तुम्ही मास्कचा योग्य तो वापर, शाळेमध्ये गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे गप्पा मारताना मास्क घालूनच गप्पा माराव्यात आणि वारंवार हात धुतले पाहिजे. सध्या तरी कोरोनावर कोणतेही औषध नसून या नियमांचे तंतोतंत पालन करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
शाळा प्रमुखांनीही शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन वर्ग खोल्यांचे शौचालयाचे सॅनिटायझर करुन घ्यावे. विद्यार्थी आणि शिक्षक 100 टक्के मास्कचा वापर करतील याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल. विद्यार्थी आजारी असल्यास त्यांनी शाळेत जावू नये आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. पूर्णपणे बरे झाल्यानंतर शाळेत जावे. 9, 10, 11 व 12 मध्ये शिक्षक असणारे विद्यार्थी मास्कचा योग्य वापर, सुरक्षित अंतर ठेवून गप्पा व वारंवार हात धुतील असा विश्वासही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |