12:57am | Feb 28, 2023 |
सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर सध्या आजी चे माजी झाल्यामुळे फलटण मतदारसंघात भलतेच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. सत्तेत असताना कार्यकर्त्यांकडे साधे ढुंकून न बघणारे, तेच आता कार्यकर्त्यांच्या गळ्यात गळे घालू लागले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व मिस्टर रामराजे यांच्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादातून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर फलटणचे राजकीय रण तापल्यामुळे येत्या काळात फलटण शहरासह तालुक्यात मात्र कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. फलटण तालुका हा तसा अवर्षणग्रस्त. या तालुक्याने पाण्यासाठी मोठा संघर्ष पाहिलेला आहे. माजी दिवंगत आमदार कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी फलटणच्या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. हायड्रोलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी निरा-देवघरचे फलटण आणि उत्तर सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी बारामतीला पळवले. कृष्णा पाणी तंटा लवादामधील नियमानुसार एका खोर्यातील पाणी दुसर्या खोर्यात आणता येत नाही. असे असतानाही हायड्रोलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तालुके भिकेला लावले. मात्र, बारामती तालुका सुजलाम सुफलाम करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली आणि त्यांचीच तळी गेली अडीच दशके मिस्टर रामराजे उचलत आहेत, असा आरोपही परवा खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. विधानसभा सभापती पदावरुन पायउतार झाल्यानंतर मिस्टर रामराजेंना फलटण तालुक्यात फारसे काही काम उरले नाही, अशा लोकांच्या खासगीत चर्चा सुरु आहेत. विधान परिषदेतील आपल्या कार्यालयात पायाची तिढी मारुन ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्री, आमदारांची फिरकी घेताना मिस्टर रामराजेंना मजा यायची. परंतू राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या सभापतीपदी विराजमान होवूनही फलटण तालुक्यासाठी मिस्टर रामराजेंना फारसे असे काही करता आले नाही, अशा चर्चाही फलटण तालुक्यामधील ज्येष्ठांमध्ये झडत आहेत. पूर्वी धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात मी आणले, असा ऊर बडवून मिस्टर रामराजेंनी तालुक्यात आजपर्यंत पाण्याचे राजकारण केले आणि त्याच जोरावर रामराजेंनी तालुक्यात सत्ता राखली. प्रकल्प शासनाचा, त्यासाठी लागणारे पैसे शासनाचे, काम पूर्णत्वास नेणार्या यंत्रणाही शासनाच्या. मग मिस्टर रामराजेंनी आपल्या स्थावर व जंगम मालमत्ता विकून धोम-बलकवडीचे पाणी तालुक्यात आणले काय? मिस्टर रामराजे पूर्वी जलसंपदा मंत्री होते. सातार्यातील सर्किट हाऊस मध्ये बसल्यानंतर कृष्णा खोरेच्या कंत्राटदारांच्या घोळक्यातून त्यांचा पायही फलटणमधील साध्या कार्यकर्त्याला दिसत नव्हता. सत्ता येत-जात असते. माणसाने माज करायचा नसतो. माज केला तरी तो शरद पवारांसारखा करायचा. कारण ते करुनही शकतात आणि पचवूही शकतात. फलटण-बारामती या दोन शहरांमधील अंतर हे फक्त 20 किलोमीटरचे आहे. पण या दोन्ही शहरांमध्ये विकासात्मक तुलना केल्यास जमीन-आस्मानाचा फरक जाणवेल. ना धड रस्ते, ना नागरी सोई-सुविधा. सुधारित खेड्याला लाजवेल असे फलटण शहर. पण हेच शहर गेल्या अडीच दशकात विकसित होण्याऐवजी भकास झाले. त्याला कारणीभूत कोण, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पूत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वडिलांनंतर खासदार होत फलटण तालुक्यात विक्रम केला. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे फलटणला रेल्वे आणण्याचे स्वप्न त्यांच्या पुत्राने पूर्ण करुन दाखवले. जिल्ह्यातील फलटण तालुक्यासह माढा तालुक्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न तडीस नेले. सध्या निरा-देवघरच्या पाण्यावरुन मिस्टर रामराजे आणि खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच हाताशी काहीच काम न उरलेल्या मिस्टर रामराजेंनी सातारा जिल्ह्याचे पाणी जिल्ह्याला द्यायचे की माढा मतदारसंघाला द्यायचे, असा सवाल केला होता. मिस्टर रामराजेंच्या या वक्तव्यामुळे सांगोला तालुक्यातील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकार्यांना हा प्रश्न जिव्हारी लागला होता. म्हणून काल दि. 26 रोजी मिस्टर रामराजेंचा पुतळा जाळण्यात आला होता. मिस्टर रामराजेंचा पुतळा जाळल्यामुळे फलटण मधील राजे गटामध्ये सुतकी कळा निर्माण झाली होती. फलटणमधील शुक्रवार पेठेत झालेल्या कुदलाकुदलीमुळे कोम्यात गेलेला राजे गट मिस्टर रामराजेंचा पुतळा जाळल्यानंतर गलितगात्र झाला की काय, अशा चर्चा फलटण शहरात झडत होत्या. सेनापतीच अधू झाल्यानंतर सैनिकांसह हवशे-गवशे-नवशेही पृष्ठभागाला पाय लावतात. मात्र याही परिस्थितीमध्ये फलटणमध्ये राजे गटाची बैठक झाल्याचे ऐकिवात आहे. फलटण शहर मोठ्या राजकीय संघर्षानंतर पुन्हा एकदा शांत झाले आहे. मात्र मिस्टर रामराजेंनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांना फूस लावून फलटण शहरात काही आगळीक केली तर मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसर्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून आजपर्यंत गोळ्या चालविणार्या मिस्टर रामराजेंकडे तसे जातिवंत खांदेही उरले नसल्याने येणारा काळ हा त्यांच्यासाठी कसोटीचा असणार आहे. दुसर्याने केलेल्या कामासंदर्भातील फुकाचे श्रेय लाटून काहीही हाशील होणार नाही. ज्याने-त्याने केलेल्या कामाचे श्रेय त्यालाच दिले पाहिजे, यामध्येच राजकीय सूज्ञता आणि परिपक्वता आहे. नाहीतर हल्ली कोणाचे नाव वापरुन कोणी काय करेल, याचा नेम राहिलेला नाही. गेल्या चार वर्षामध्ये तरुण, तडफदार असणार्या खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विकासकामांचा गोवर्धन माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. त्यामुळे पद आणि सत्ता गेलेल्या मिस्टर रामराजेंचे पित्त मात्र खवळलेले आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांना डायजेस्ट न होत असल्याने त्यांचे फ्रस्ट्रेशनही वाढले आहे. आणि या फ्रस्ट्रेशनमुळेच ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर फलटणचे राजकीय रण तापलेले आहे. या तापलेल्या राजकीय रणामुळे फलटण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा तर उडणार नाही ना, याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |