12:43pm | Dec 19, 2020 |
अॅडलेड : भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या आशा पल्लवीत झालेला भारतीय संघ आत लाजिरवाण्या पराभवाच्या छायेत आला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांत गुंडाळून 53 धावांची आघाडी घेणार्या भारतीय संघाची दुसर्या डावात ऑस्ट्रेलियन मार्यासमोर भंबेरी उडाली. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड या दुकलीने भारतीय संघाला खिंडार पाडत संघाची अवस्था दयनीय केली.
भारताचा दुसरा डाव 9 बाद 36 वर संपुष्टात आला. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचं सोपं आव्हान मिळालं आहे. या निमित्ताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आपल्या निच्चांकी धावसंख्येची नोंद केली आहे. 1974 साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने 42 धावा केल्या होत्या. त्यानंतर 46 वर्षांनी भारतावर ही नामुष्की ओढावली आहे.
दुसर्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने 1 बाद 9 अशी मजल मारली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. ज्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली.
हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. अखेरीस भारताचा दुसरा डाव 9 बाद 36 धावांवर संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. टीम इंडियाचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. कांगारुंकडून जोश हेजलवूडने 5 तर पॅट कमिन्सने 4 बळी घेतले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |