02:26pm | Feb 02, 2022 |
फलटण : मलठणमधील नागरिक मालमत्ताधारक दरवर्षी वेळेवर नगरपालिकेचा संकलित कर व पाणीपट्टी भरत आले आहेत. तरी सुध्दा राजकीय आकसापोटी काही मंडळींनी मलठणमधील कामे होण्यास विरोध केला आहे. आता येत्या आठ दिवसात पालखी मार्ग रस्ता व अंतर्गंत रस्त्याची कामे मार्गी लावा अन्यथा पालिकेसमोर मलठणमधील नगरसेवक व नागरिक धरणे आंदोलन करतील, असा इशारा पालिकेतील विरोधी गटाचे गटनेते नगरसेवक अशोक जाधव यांनी दिला आहे.
याबाबत फलटण नगरपालिकेच्या प्रशासकांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेवर सध्या प्रशासकाची नेमणूक झाली आहे. मात्र, गेली पाच वर्षात आम्ही नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, मंगलादेवी नाईक निंबाळकर, मिना कृष्णात नेवसे, मदलसा संभाजी कुमार, सचिन रमेश अहिवळे, अशोक जयवंत जाधव यांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करुनसुद्धा निव्वळ राजकीय हेतूने नगरपरिषदेतील सत्ताधारी पार्टीने मलठणमधील विकास होवू दिला नाही व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
वास्तविक मलठणमधील नागरिक मालमत्ताधारक दरवर्षी वेळेवर नगरपालिकेचा संकलित कर व पाणीपट्टी भरत आले आहेत. तरी सुद्धा राजकीय आकसापोटी काही मंडळींनी मलठणमधील कामे होण्यास विरोध केला. जे नागरिक नगरपरिषदेचा कर भरत आहेत, त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणे हे नगरपालिकेचे काम असून ते न केल्यामुळे मलठण मधील नागरिकांना सापत्न भावाची वागणूक दिली गेल्याचे दिसत आहे.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मलठणमधून जाते. त्या रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्या रोडकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. या मलठणमधील पालखी रस्ता व अंतर्गत रस्त्यांची कामे आठ दिवसात सुरू करावीत, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून मलठणमधील सर्व नगरसेवक व नागरिक पालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करतील, असा इशारा नगरसेवक अशोक जाधव यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |