09:09pm | Jan 23, 2021 |
सातारा : आपल्या सातारा शहराचं नाक म्हणून पोवई नाक्याची ख्याती आणि ओळख आहे. पोवई नाका अर्थात छ. शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता याच पोवई नाक्यावर 'आय लव्ह सातारा' आयलँड, सेल्फी पॉईंटची लवकरच उभारणी होणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारणीसह पोवई नाका येथे सुशोभीकरण केले जाणार आहे.
प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात आणि कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो. त्यामुळे पोवई नाक्याला ऐतिहासिक आणि विशिष्ट स्थानिक असे महत्व आहे. याच पोवई नाक्यावर नुकतीच ग्रेड सेपरेटरची उभारणी झाली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे सातारकरांना नेहमीच अभिमानास्पद असणाऱ्या पोवई नाक्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे यांच्या संकल्पनेतून भारदस्त अशा सेल्फी पॉईंटची उभारणी केली जाणार आहे.
कोल्हापूर, कराड यासह अनेक शहरांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर सातारा शहराची आगळी वेगळी ओळख सांगणारा आय लव्ह सातारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी भव्यदिव्य सुशोभीकरण करण्यात येणार असून हा आयलँड लक्षवेधी असणार आहे. सातारकरांसह बाहेरून येणारे पर्यटक, प्रवाशी यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट एकप्रकारचे पर्यटनस्थळ असणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या स्वखर्चातून या पॉईंटची उभारणी केली जाणार असून या सेल्फी पॉईंटची सातारकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |