01:28pm | Oct 23, 2020 |
फलटण: सुरवडी येथील सचिन शिंदे व उमेश जगताप यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गोल्डन सिटीत घरफोडीसाठी आलेल्या चोरट्यांचा बेत फसला. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्यास पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरवडी परिसरात त्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक केले जात आहे. कौश्या सुधाकर भोसले (रा. वाखरी) असे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.22 ऑक्टोबर सचिन महिपती शिंदे हे कमिन्स कंपनीतील काम आटोपल्यानंतर त्यांच्या घरी परतले. रात्री 11.30 च्या दरम्यान घरी परतल्यानंतर घरात पाणी नसल्याचे लक्षात येताच पुन्हा पार्किगच्या ठिकाणी असणार्या पाण्याचा टाकीचा कॉक सुरू करण्यासाठी आले होते. यावेळी गोल्डन सिटीमध्ये भाडेकरू म्हणून राहणार्या गजानन रणवरे यांच्या कॅलरीत त्यांना दोन व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आल्या. यावेळी नीट निरखून पाहिल्यानंतर त्यांना या दोन व्यक्ती श्री. रणवरे यांच्या किसनची खिडकी उचकटत असल्याचे लक्षात येतात. त्यांनी त्या चोरट्यांना हटकले. कोण आहे रे तिकडे? असा आवाज देताच ते दोन चोरट्यांनी उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सचिन शिंदे यांनी त्यांच मित्र उमेश जगताप यांना हाक मारली. उमेश जगताप येताच या दोघांनी चोरांचा पाठलाग केला. तारेच्या कंपाऊंडजवळ आल्यानंतर त्यातील एका चोरट्याने काचेची बाटली फोडून धाक दाखविण्याचा प्रयत्नही केला. या दरम्यान एक चोरटा पसार झाला. परंतु दुसर्या चोरट्याला या दोघांनी पकडले. या चोरट्याला पकडल्यानंतर गोल्डनसिटीतील इतर नागरिकंना आवाज देवून उठवले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दखल झाले. पकडलेल्या चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तेव्हा सचिन यांनी त्यांचा मित्र उमेश जगताप यांना हाक मारली, ते आल्यानंतर त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला परंतु त्यातील एकाने त्याचेकडील असलेली काचेची बाटली फोडुन सचिन यांना धाक दाखविला. त्यावेळी त्याच्या बरोबर असलेला त्याचा साथीदार तारेच्या कंपाउंड मधुन उडी मारुन पळुन जात होता. तो तारेच्या कंपाउंड जवळ असताना सचिन शिंदे व उमेश जगताप या दोघांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्यानंतर सचीन व उमेश यानी गोल्डन सिटी मधील इतर नागरिकाना आवाज देऊन उठवले. व नंतर पोलिसांना बोलवून चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुरवडी मधील गोल्डन सिटीतील रहिवाशी सचिन शिंदे व उमेश शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगाधानामुळे चोरटा पकडण्यात यश आले व घरफोडीचा बेत फसला त्यामुळे त्यांचे सुरवडी परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |