06:14pm | Sep 15, 2021 |
सातारा : बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरीचा उलगडा झाला असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व तीन हजार रुपये रोख असा 48 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
समीर सुनिल घोरपडे (वय 22, रा. नागठाणे, मुळ रा. मत्यापुर ता.जि.सातारा) आणि सागर रमेश शिर्के (वय 30, रा.महाराट्र बॅकेशेजारी, नागठाणे ता.जि.सातारा) अशी जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास विठ्ठल दादासो निकम (वय 47, रा. दुटाळवाडी, पोस्ट नुने, ता.पाटण, जि.सातारा) हे कामानिमीत्त स्वतःच्या हिरो कंपनीच्या लाल रंगाची पॅशन प्रो मोटार सायकल क्र.एम.एच.508 जी.3406 घेवून नागठाणे येथे आले होते. त्यांचे काम झाल्यानंतर प्रिन्स बियर बार समोर उभे असताना रात्री 8.30 वा. चे सुमारास त्यांच्याजवळ दोन अज्ञात इसम आले व त्यांनी गावाचे नाव विचारले असता त्यांना दुटाळवाडी असे सांगताच ते इसम म्हणाले की, आम्हालाही दुटाळवाडी गावातच जायचे आहे. तेथे आमची मावशी आहे. त्यानंतर त्या अज्ञात इसमापैकी एकजण म्हणाला की, मी तुमची गाडी चालवितो. तुम्ही पाठीमागे बसा असे म्हणुन गाडीची चावी घेतली. त्यानंतर तीघेजण मोटार सायकलवरुन सासपडे रोडने जात असताना अज्ञात इसमांनी गाडी खडी क्रशर जाणार्या रोडला थांबविली व त्या दोन इसमांनी विठ्ठल दादासो निकम यांना गाडीवरुन खाली उतरवुन रोडवर पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातुन दहा हजार रुपये रोख व 45 रुपये किंमतीची हिरो कंपनीची लाल रंगाची पॅशन प्रो मोटार सायकल क्र.एम.एच.50 जी.3406 अशी एकुण 55 रुपये किंमतीच्या मुद्देमालाची जवरदस्तीने चोरी केली होती.
त्यानंतर फिर्यादी याने घडलेल्या घटनेबाबत बोरगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटना गंभीर स्वरुपाची असल्याने बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी वरीष्ठांना कळविली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ व त्यांचे पथक गोपनिय बातमीदारांना सतर्क करुन व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे गुन्हेगारांच्या मागावर होते. यातील सीसीटीव्ही फुटेजमधून या दोघा अज्ञात इसमापैंकी एक सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर यापुर्वी बोरगाव पोलीस ठाण्यात बेकायदा बिगरपरवाना गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
या दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असुन त्यांच्याकडून रोख रक्कम 3 हजार रुपये व 45 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची लाल रंगाची पॅशन प्रो मोटार सायकल क्र.एम.एच.50 जी.3406 असा एकुण 48 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अशाप्रकारे बोरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने जबरी चोरीसारखा गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना 24 तासांत जेरबंद केले आहे. या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी रिंमाड मंजुर केली आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पो.कॉ.विजय साळुंखे, विशाल जाधव, सत्यम थोरात, राहुल भोये यांनी केली आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |