01:51pm | Sep 07, 2021 |
मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. टीम इंडिया सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला सामना अनिर्णित राहिला. यानंतर टीम इंडियाने लॉर्ड्सवर जबरस्त विजय नोंदवला. भारतीय संघाला लीड्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर चौथ्या सामन्यात विराट कोहलीच्या सैन्याने शानदार पुनरागमन केले आणि ओव्हल कसोटी जिंकली. आता भारताला मँचेस्टरच्या मैदानावर खेळावे लागेल जिथे त्यांनी आतापर्यंत एकही कसोटी जिंकलेली नाही.
पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी, ते मालिका गमावणार नाहीत. पण टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करेल. २००७ पासून भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकलेला नाही. इंग्लंडने विजय मिळवल्यास मालिका २-२अशी बरोबरीत सुटेल. भारताने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये ९ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांना २०१४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पाच सामने अनिर्णित राहिले आहेत.
जर भारतीय संघाने मँचेस्टरमध्ये प्रथमच विजय मिळवला तर ते इतिहास घडवतील. टीम इंडिया १९३६ मध्ये पहिल्यांदा या मैदानावर खेळायला आली होती. त्यानंतर ती सामना अनिर्णित करण्यात यशस्वी झाली. त्या वेळी इंग्लंडमध्ये बरोबरी मिळवणे विजयाएवढे मानले जात होते. यानंतर १९४६ मध्ये खेळलेली कसोटीही अनिर्णित राहिली. १९५२ मध्ये भारताला येथे पहिला पराभव मिळाला.
मँचेस्टरमध्ये २०१४मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला येथे एका डावाने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनी बदला घेण्यास नक्की उत्सुक असेल.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |