01:27pm | Jun 30, 2020 |
हरिद्वार : कोरोनावरील प्रभावी औषध निर्माण करण्यात पतंजलीला यश आल्याचा दावा करणार्या पतंजलीने आता असे काही झालेच नसल्याचा दावा केला आहे. प्रत्येकाच लक्ष कोरोनावरील औषधाकडे लागलेलं असताना बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं मागील आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर त्यांनी हे औषध बाजारातही आणलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
कोरोनानं देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनावर औषध विकसित करण्यासाठी रात्रंदिवस संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडं बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.
पतंजलीचं औषध जगासमोर आल्यानंतर उत्तराखंड आयुष विभागानं परवानगी दिली नसल्याचं सांगितलं. तसंच पतंजलीला नोटीसही जारी केली होती. या नोटिसीला अखेर पतंजलीकडून उत्तर देण्यात आलं आहे. यासंदर्भात हिंदी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. नोटिसीला उत्तर देताना पतंजलीनं कोरोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून कोलांटउडी घेतली आहे. कोरोना बरं करणार कोणतंही औषध बनवले नसल्याचं पतंजलीनं म्हटलं आहे.
पतंजलीनं औषध बाजारात आणल्यानंतर उत्तराखंड आयुष विभागानं कोरोनावर औषध बनवण्याची परवानगी दिली नव्हती असा खुलासा केला होता. पतंजलीनं केवळ ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध बनवण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यांच्या अर्जात कोरोनाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे पतंजलीला नोटीस पाठवू, असं उत्तराखंड आयुष विभागाच्या परवाना अधिका-यानं म्हटलं होतं. त्यानंतर 24 जून रोजी पतंजली दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारनं कोरोनाची जाहिरात व विक्री बंद केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय या औषधाच्या चाचण्या घेत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |