12:10pm | Sep 14, 2021 |
पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या २० गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. उरलेल्या १९ गावांनी कोरोनाचा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापनाच केली नाही. काही मंडळांनी अध्यक्ष किंवा एखाद्या सभासदाच्या घरी गणपती बसवून उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याला प्राधान्य दिले आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ३९ गावे येतात. सपोनि संदीप शितोळे, उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे आणि सहकाऱ्यांनी प्रत्येक गावात बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक कार्यक्रमांवर भर देण्याचे आवाहन केले होते. पोलीसांच्या आवाहनाला सर्वच गावांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. २० गावांमधील सार्वजनिक मंडळांनी एका गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. उर्वरित १९ गावांमध्ये एकही सार्वजनिक गणपती बसविण्यात आला नाही. काही मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता अध्यक्ष किंवा एखाद्या सभासदाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
सर्वच गणेश मंडळांनी उत्सवावरील खर्च टाळून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, कोरोना रुग्णांना मदत, मास्क, सॅनिटायझरचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांनी आणि सार्वजनिक मंडळांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. कोरोना प्रादुर्भाव ध्यानात घेता अनावश्यक खर्च टाळून सगळीकडे समाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर मी व माझे सहकारी विशेष लक्ष ठेवून आहोत.
- सपोनि संदीप शितोळे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |