03:35pm | Nov 22, 2021 |
फलटण : मांडव खडक, ता. फलटण येथे फायनान्स वर घेतलेल्या वस्तूची वसूली करण्यासाठी आलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन गुंडांनी घरात घुसून टिव्ही तसेच इतर साहित्य पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिलांनी तसेच इतर युवकांनी याला विरोध केला असता त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी गावकरी एकवटल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला.
याबाबत अधिक माहिती अशी, आज दि. 22 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांडवखडक, ता. फलटण येथील एका युवकाने बजाज फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर टिव्ही घेतलेला आहे. या टिव्हीचा एकच हप्ता बाकी होता. असे असतानाही बजाज फायनान्स कंपनीचे दोन गुंड कोणतीही पूर्वसूचना न देता त्या युवकाच्या घरात घुसले. त्यांनी भिंतीवर लावलेला टिव्ही तसेच घरातील इतर साहित्य उचलण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरातील लोकांनी ज्याने टिव्ही घेतलाय, तो वैद्यकीय उपचारासाठी परगावी गेला आहे, तो आल्यानंतर तुम्ही चर्चा करा आणि त्यानंतरच टिव्ही नेण्याचा निर्णय घ्या, असे सांगितले. परंतू बजाज कंपनीच्या त्या गुंडांनी काहीही न ऐकता अनाधिकाराने दुसर्याच्या घरात घुसून टिव्ही तसेच इतर वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील महिला व काही युवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या गुंडांनी त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी सुरु असलेल्या प्रकारामुळे गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घाबरुन बजाज फायनान्स कंपनीच्या गुंडांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी काही लोकांनी त्यांच्याकडील मोबाईलद्वारे त्यांचे फोटोही काढले आहेत. दिवसाढवळ्या अनाधिकाराने एखाद्याच्या घरात घुसणे हे कायद्याने योग्य आहे काय? फायनान्स कंपन्यांना काही मर्यादा व अचारसंहिता आहेत. त्याचे पालन फायनान्स कंपन्यांकडून केले जाते काय? याचा विचारही कायद्याची अंमलबजावणी करणार्या पोलिसांना करावा लागणार आहे. दरम्यान, दुपारी उशिरापर्यंत याबाबत कोणत्याही गुन्ह्याची नोंद फलटण ग्रामीण पोलिसांत झाली नव्हती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |