07:56pm | May 11, 2021 |
सातारा : काल दि. 10 रोजी मौजे नायगांव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाला होता. या खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, किरकोळ कारणावरून सख्ख्या अल्पवयीन भावाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान नायगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत गुजरमळा नावाच्या शिवारात प्रशांत चनाप्पा जमादार (वय 8) त्याच्या गळ्यावर व डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने मारून त्याचा खून केला होता. याबाबतची फिर्याद त्याच्या वडिलांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आदींनी घटनास्थळी भेट दिली होती.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व शिरवळ पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तपास पथकाने घटनास्थळी सूक्ष्म निरीक्षण करून फिर्यादी चनप्पा जमादार (वय 35) रा. गुजरमळा, माळव रस्ता, नायगाव, ता. खंडाळा याची पत्नी व मोठा मुलगा तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केली असता खून झालेल्या प्रशांत जमादार व त्याचा अल्पवयीन मोठा भाऊ यांच्यात दुपारच्या वेळेला भांडण झाल्याची माहिती समोर आली.
त्या अनुषंगाने अल्पवयीन मुलाकडे विचारपूस केली असता तो माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता किरकोळ घरगुती भांडणातून रागाच्या भरात घरातील कुऱ्हाडीने त्याचा लहान भाऊ प्रशांत जमादार यांचा डोक्यात व गळ्यावर वार करून खून केला असल्याचे त्याने सांगितले, असेही अजय कुमार बंसल यांनी यावेळी नमूद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, रवी वाघमारे, विशाल पवार, पंकज बेसके, शिरवळ पोलीस ठाण्याचे स.फौ.पांडुरंग हजारे, राजू अहिरराव, पो.हवा.रविंद्र कदम, आप्पासाहेब कोलवडकर, मदन वरखडे, पो.ना.सचिन वीर, पो.कॉ.स्वप्नील दौंड, नितीन महांगरे, संतोष ननावरे, सचिन शेलार, मंगेश मोझर, विकास इंगवले यांनी केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |