04:35pm | Nov 30, 2020 |
सातारा: कोरोनासारख्या भयंकर संकटाने या वर्षात सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. अगोदरच मंदीच्या फेर्यात अडकलेले बांधकाम व्यावसायिक कोरोनाच्या लाटेने उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात केलेली कपात ही खरोखरच एक प्रभावी पाऊल ठरत आहे. पण ही सवलत तात्पुरतीच असणार आहे. पुन्हा मूळ स्वरूपात मुद्रांक शुल्क वसूल करणे सुरू झाले तर अडखळत सुरू झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा अडचणीत येईल. त्यामुळे शासनाने मुद्रांक शुल्कात केलेली कपात पूर्णपणे मागे न घेता काही प्रमाणात सवलत यापुढेही सुरू ठेवावी. तसेच दरवर्षी रेडी रेकनर दरातील वाढ ही दिवसेंदिवस बांधकाम व्यवसायाला मारक ठरत आहे. सातारा शहरापुरता विचार केला तर शहर आणि परिसरातील 50 टक्के पेक्षा जास्त मिळकतीच्या बाबतीत रेडी रेकनरचा दर जास्त आणि प्रत्यक्षातील बाजारभाव कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे शासनाने रेडी रेकनरच्या दरात नेहमीप्रमाणे वाढ न करता शक्य असल्यास कपातच करावी या विनंतीचे निवेदन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेतफे सह जिल्हा निबंधक श्री. खांडेकर यांना देण्यात आले. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराज दिक्षीत, उपाध्यक्ष राजेश देशमुख, सेक्रेटरी साहिल शेख, खजिनदार विजयसिंह जगदाळे, सर्व पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराज दिक्षीत म्हणाले की बांधकाम व्यवसाय म्हणजे फक्त बांधकाम व्यवसायापूरता मर्यादित नसून हजारो लोकांचे संसार यावर अवलंबुन असतात. शासनालाही या व्यवसायामुळे कररूपात भरघोस उत्पन्न मिळत असते. यासाठी हा व्यवसाय टिकणे सामोजिक दृष्टया अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने रेडी रेकनरच्या दरात नेहमीप्रमाणे वाढ न कता कपात करून बाजारभाव व दरातील तफावत याचा अभ्यास करावा.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |