07:02pm | Jan 16, 2022 |
कराड : सर्वांच्याच जीवनात जेष्ठ, वडीलधारी मंडळींचे योगदान महत्वाचे असते. त्यामुळे ते आपल्याला नेहमी आदरणीय, गुरुस्थानी व देवस्वरूप असतात. त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि त्यांच्या आयुष्यातील कटू-गोड अनुभवांची शिदोरीच बऱ्याचदा आपल्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणास्त्रोत ठरते. त्यामुळे आधुनिकतेची कास धरताना जुन्या पिढीला जपने हे नवीन पिढीचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, तथा शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांनी केले.
शनिवारी १५ रोजी वहागाव ग्रामपंचायतीचा ७१ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने इंद्रजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा, तसेच विशेष पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कराड तालुका पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, वहागावचे सरपंच संग्राम पवार, उपसरपंच सौ. आनंदी पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. रंजना पवार, सौ. शीला पवार, सौ. सुजाता पुजारी, संतोष कोळी, धनंजय पवार, हणमंत शिंदे यांच्यासह जेष्ठ नागरिक, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच संग्राम पवार यांच्या संकल्पनेनूसार गावच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आदर्श माता पुरस्कार श्रीमती लिलादेवी पांडुरंग पवार, आदर्श शेतकरी पुरस्कार निवासराव महादेव पवार, आदर्श उद्योजक पुरस्कार मनोजराव पंढरीनाथ पवार व निवासराव ज्ञानू पावर यांना देण्यात आला. तसेच वहागाव भूषण हा विशेष पुरस्कार विलासराव बापूसो पाटील व बापूराव विठोबा पवार यांना देण्यात आला.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात इंद्रजीत देशमुख, सरपंच संग्राम पवार, दिपक पवार, बाळासाहेब पवार, भीकु पवार, जनार्दन पवार (कॅप्टन) यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच संग्राम पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिकेत पवार यांनी केले. तर धनंजय पवार यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |