12:39pm | Jun 11, 2021 |
फलटण : मौजे सासकल, ता.फलटण येथे बेरडकी वस्तीवरील लाईट पोल व त्यावरील विद्युत वाहक तारांच्या जोडणी करण्यासंबंधी 14 व्या वित्त आयोगातून सरपंच-ग्रामसेवक सासकल यांनी दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी 35 हजार रुपयांचा धनादेश प्रवीण ज्ञानदेव सोनवलकर यांच्या नावे काढला. हे काम प्रत्यक्ष झालेले नसतानाही पूर्ण धनादेश दिला. हे काम चंचलवाड वायरमन असताना त्यांच्या काळात देण्यात आल्याचे समजते. चंचलवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबतीत माझा काही संबंध नसल्याचे सांगितले. या संदर्भात सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने सरपंच-ग्रामसेवक यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या आधीन राहून या कामाविषयी दि. 3 जून 2021 रोजी अर्ज देऊन माहिती मागवली आहे. परंतु आजतागायत माहिती दिली नाही. आज देतो उद्या देतो अशी उत्तरे सासकल गावाचे ग्रामसेवक अंगराज जाधव देत आहेत. या संदर्भात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी उपविभाग - गिरवी चे सहाय्यक अभियंता अशोक भोसले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी याबाबत आमच्या कार्यालयाशी कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार झाला नसल्याचे व या कामाचे कोणतेही शुल्क आमच्याकडे जमा झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
याबाबत त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर दि. 8 जून 2021 रोजी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. यात या कामाचा तांत्रिक मंजुरी आदेश, सरपंच-ग्रामसेवक यांचा अर्ज, शुल्क जमा केल्याबाबतची पावतीही माहिती मागवली आहे.
या बेरडकी वस्तीवर 2 व पठारावर 1 लाईटचे खांब उभे केले आहेत.परंतु त्यावर विद्युत वाहक तारा जोडल्या नाहीत. या कामाचा धनादेश देऊन 7 महिने उलटले तरीही काम पूर्ण नाही. या संदर्भात बेरडकी वस्तीवरील लोकांच्या मुलाखती घेतल्या असता ही माहिती मिळाली की, प्रस्तावित जागेवर लाईटचे पोल लावून 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी पोलवर विद्युत तारा ओढल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मौजे सासकल येथे बेरडकी वस्तीवरील लाईट पोल व त्यावरील विद्युत वाहक तारा ओढण्याचा घोळ हा कायम आहे. यात पैशांचा अपहार व या कामाची केलेली कार्यपद्धती संशयाच्या भोवर्यात आहे. त्यामुळे याची चौकशी केली नाही व योग्य कारवाई केली नाही तर जन आंदोलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |