सातारा : स्क्रॅप मर्चंटची सुमारे 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2011 ते 23 सप्टेंबर 2022 दरम्यान कौशिक भारत पाटील सीनियर कम मॅनेजर, एसडीएफसी बँकेतील लाइफ इन्शुरन्स शाखा राधिका रोड, सातारा आणि मंदार कुलकर्णी हे दोघे कांतीलाल सुरेश अग्रवाल यांना भेटण्यासाठी अग्रवाल यांच्या स्क्रॅपच्या दुकानावर गेले. तेथे त्यांनी एचडीएफसीमध्ये लाइफ इन्शुरन्स पॉलिसी परिवारासाठी कशी चांगली आहे, याचे अमिष दाखवून कांतिलाल अग्रवाल यांना पॉलिसी काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे कांतिलाल अग्रवाल यांनी स्वत:सह परिवारातील अन्य सदस्यांचीही पॉलिसी काढली. यानंतर अग्रवाल यांच्याकडे भरलेल्या विम्याचे रक्कम 33 लाख रुपये भरून घेऊन त्यांनी विमा भरल्याच्या पावत्या दिल्या. काही काळानंतर या दुक्कलीने एचडीएफसी मधील अग्रवाल आणि परिवाराची पॉलिसी अग्रवाल यांच्या अपरोक्ष सरेंडर केली. यानंतर आलेली रक्कम त्यांनी इंडियन बँकेत फेक अकाऊंट काढून ती अग्रवाल यांच्या नावाने भरली. दरम्यान 11 वर्षे कांतीलाल अग्रवाल हे विश्वासाने या दुक्कलीला दरवर्षी विमा पॉलिसीच्या हप्त्याचे पैसे देतच होते. मात्र हे दोघे त्या पैशाचा विनियोग अन्य कारणांसाठी करीत होते.
23 सप्टेंबर रोजी पैशाची गरज असल्याने पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कांतिलाल अग्रवाल हे एचडीएफसी बँकेत गेले असता त्यांची पॉलिसी तेथून पूर्वीच सरेंडर झाल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांतिलाल अग्रवाल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे धाव घेत कौशिक भारत पाटील आणि मंदार कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक मुल्ला करीत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |