12:54pm | Aug 23, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना संकटाने चिंताग्रस्त झालेल्या भारतीयांसाठी एक चांगली बातमी आली आहे. कोरोना विषाणूवरील लसीची असलेले प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. 73 दिवसांमध्ये ‘काविशिल्ड’ नावाची कोरोना विषाणू लस तयार होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारतर्फे मोफत लसीरकरण करण्यात येणार आहे. याबाबत या लसीवर काम करणार्या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे.
या लसीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. बिझनेस टुडेने सिरम इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
‘सिरम’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सरकारने ‘सिरम’ला लसीचा ‘विशेष उत्पादन प्राधान्य परवाना’ दिला आहे. तसेच चाचण्यांची प्रोटोकॉल प्रक्रिया 58 दिवसांत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे सूचित केले होते. याद्वारे पहिला डोस हा शनिवारी (22 ऑगस्ट) त्यानंतर दुसरा डोस हा 29 दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आम्ही ‘कोविशिल्ड’ लस बाजारात आणण्याच्या विचारात आहोत. या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीला भारतातील 20 केंद्रांवर शनिवारपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. या टप्प्यात 1,600 लोकांवर याची चाचणी होणार आहे.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ही लस सिरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असून कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अॅस्ट्रा झेनिका लॅबशी याबाबत सर्वात आधी करार केला आहे. या करारांतर्गत भारतासाठी या लसीचे हक्क आणि रॉयल्टी घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील 92 देशांमध्ये या लसीची विक्री केली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |