सातारा : साताऱ्यात जकातवाडी येथे पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतल्याने युवक-युवतीचा मृत्यू झाला. डबेवाडी येथील रुपाली बबन माने (वय २३) आणि जकातवाडी येथील देवानंद लोंढे (वय २५) असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. मात्र, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले असून या कुत्र्याने आणखी ५ जणांचा चावा घेतला असल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे. सातारा शहराचा कचरा सोनगाव येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. यामुळे उघड्यावर असलेल्या कचऱ्यावरील अन्नाच्या शोधत आलेली भटकी कुत्री येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दुसरीकडे सातारा शहर परिसरातील कुत्र्यांचे सातारा नगर पलिकेच्या माध्यमातून निर्बीजिकरण करण्यात आले नसल्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सदर बझार परिसरात देखील असलेल्या कत्तलखान्यामुळे येथे कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ७ ते ८ कुत्र्यांच्या टोळक्याने एका चिमुरडीला लक्ष करत तिच्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कालच कैद झाली होती.
काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांनी मुलाचे भर दिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले साताऱ्यात होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातारा नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात वेळेत लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |