वाई : देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात मोठा वाटा होता.
अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता (कवठे ता. वाई) येथील वैकुंठ स्मशानभूमीत होईल.
सुरेशअण्णा वीर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
“सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुरेशअण्णा वीर यांच्या निधनानं सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार चळवळीतलं ज्येष्ठं व्यक्तिमत्वं हरपलं आहे. सातारा जिल्ह्यानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. देशभक्त किसन तथा आबासाहेब वीर यांच्या त्यागाचा, विचारांचा वारसा सुरेशअण्णांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार सुरेशअण्णा वीर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |