12:21pm | Dec 12, 2020 |
पुसेगाव: कोरोनाच्या महामारीमुळे गत आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा शासन आदेशानुसार व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून दि.23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग सुरू करण्यात आले. शाळा सुरू होऊन दहा-बारा दिवस झाले असून खटाव तालुक्यात विद्यार्थी पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी उपस्थितीचा आलेख वाढतच चालला आहे. शाळांमधून ऑफलाईन अध्यापनाला सुरुवात झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत असल्याची विद्यार्थ्याकडून माऊथ पब्लिसिटी पालकापर्यंत पोहोचत असल्याने उपस्थितीत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे शिक्षकांचे मत आहे. तालुक्यातील 65 शाळांमधून शालेय घंटा खणाणत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या धोरणाची अंमलबजावणी ऑनलाईनच्या माध्यमातून होत होती. मात्र त्यातील विद्यार्थी सहभाग व परिणामकारकतेबाबत शिक्षक-पालक ही संभ्रमात होते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा व कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भावाचा विचार करून शासनाने शाळा सुरू केल्या. खटाव तालुक्यात सुरुवातीला 30 टक्के आठवड्यानंतर 50 टक्के आता तर काही ठिकाणी 90 ते 100 टक्के विद्यार्थी उपस्थिती आहे. शहरी व निमशहरी भागात उपस्थिती 30 ते 40 टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या रोडावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचीही सकारात्मकता वाढली आहे. येत्या आठ-दहा दिवसात विद्यार्थी उपस्थित चांगली सुधारणा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षक व्यक्त करीत आहेत.
अनेक गावांच्या एसटी बस गाड्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषत: कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम होत आहे.एसटी सुरू करण्याबाबत शाळांकडून वडूज आगारास पत्रे दिली गेली. सोयीनुसार एस.टी. बस सुरू होताच विद्यार्थी उपस्थिती वाढेल. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. पालकांनी प्रतिसाद वाढविण्याची गरज असल्याचे खटाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी.एन.जाधव यांनी सांगितले.
नववी ते बारावीचेच वर्ग सुरू केले असल्याने खटाव तालुक्यातील माध्यमिक शाळांत पुरेशा वर्गखोल्या व शिक्षकही आहेत. शाळांमधून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाल्याने विद्यार्थी उपस्थिती वाढत आहे. शाळेत उपस्थित राहून शिक्षण घेण्यास विद्यार्थीच उत्सूक आहेत. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे शासनाने सर्व शिक्षकांची र्लेींळव-19 पासणी केले आहे शाळातून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे तालुक्यातील 74 पैकी 65 शाळा प्रत्यक्ष सुरू झाले आहेत पुढील आठवड्यात उर्वरित शाळाही सुरू होत होतील.
- प्रतिभा भराडे
गटशिक्षणाधिकारी खटाव
विद्यालयात प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजनची तपासणी होत आहे. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण तसेच सॅनिटायझर, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था एका बेंचवर एकच विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था केली आहे. पालकांनी शाळेतील सुरक्षेच्या व्यवस्थेची माहिती घेऊन शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवून शासनाच्या निर्णयास प्रतिसाद द्यावा व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे.
- पोपट मिंड
मुख्याध्यापक: कमळेश्वर विद्यामंदिर, विखळे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |