04:09pm | Jul 06, 2020 |
सातारा: ‘मीच माझ्या सातार्याचा रक्षक’ असे म्हणत सध्या सातारा शहर परिसरतात ‘सवयभान’ वॉरिअर्स कोरोना विरोधात लढाईत जनजागृतीचे काम करत आहेत. सातारा शहर परिसरात आरोग्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांच्या शरीराची तापमान तपासणी डिजीटल थर्मामीटर द्वारे केली जात आहे. तसेच घरोघरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, सावधानता कशी बाळगावी याबाबत माहिती देणार्या माहिती पत्रकाचे वाटपही करण्यात येत आहे. सामाजिक बाधिलकीची जाणीव ठेवत सुरू असलेल्या या ‘सवयभान’ अभियानात अनेक समाजसेवाप्रेमी युवकांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
सध्या सातारा शहर व परिसरात कोरोनाचे संकट अधिक तीव्र बनत आहे. टाळेबंदीच्या काळात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होता परंतु टाळेबंदीनंतर मिळालेली सूट आता चिंताजनक परिस्थितीला आमंत्रण देवून लागली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पुढकार घेत ‘चला सातारकर सवयभान राखूया सातारा जपूया’ या अभियानाची सुरूवात केली. या अभियानांतर्गत सध्या सातारा शहर परिसरात जवळपास 20 ते 25 युवक-युवती 4 ते 5 जणांचा एक ग्रुप करून सातारकरांमध्ये जनजागृतीचे काम करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर परिसरातील सदरबझार परिसरात सध्या एक चार ते पाच युवक युवतींचा ग्रुप नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करताना दिसत आहे. या ग्रुपमध्ये श्रृती व्हावळ, निरंजन वाघमारे, प्रज्वल काकडे, आकाश पवार व सागर जानकर यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याची आवड असणार्या या युवकांनी ‘सवयभान’ अभियान यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे.
याबाबत माहिती देताना या ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले की, सर्वसामान्यपणे मानवी शरीराचे तापमान 36 ते 37.5 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान जर एखाद्या व्यक्तीचे तापमान यापेक्षा अधिक म्हणजे 40 डिग्री सेल्सीअस आढळ्यास त्या नागरिकांची माहिती ‘सवयभान’ अभियानाच्या कार्यालयात दिली जाते. तसेच संबंधित व्यक्तीस काळजी घेण्याचे सांगण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीचे तापमान 40 पेक्षा अधिक असेल तर सबंधित व्यक्तीची माहिती जिल्हा रूग्णालयात कळवली जाते. या अभियानांतर्गत घरातील सर्व सदस्यांना मास्क घालून घराबाहेर बोलावले जाते. शरीरापासून काही ठराविक अंतरावरून प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची डिजीटल थर्मामीटर द्वारे तपासणी केली जात आहे. ही माहिती संबंधित व्यक्तीला दिली जाते. तसेच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी आरोग्याविषयी आवश्यक माहिती दिली जात आहे.
सातारा शहर परिसरातील ‘सवयभान’ अभियानाचे सध्या सातारकर स्वागत करत आहेत. आम्ही केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिक विविध प्रश्न विचारत आहेत, यातून सातारकरांनीही आता करोना विरोधातील लढाईत कंबर कसली असल्याचे या ग्रुपमधील युवकांनी सांगितले.
‘सवयभान’ अभियानात सध्या सातारा शहरातील अनेक संघटनानी सहभाग घेतला आहे. यामध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट, जायंट्स ग्रुप ऑफ सातारा, सातारा कापड व्यापारी असोसिएशन, सातारा सराफ व सुवर्णकार असोशिएशन, सातारा नाभिक संघटना, पोवईनाका व्यापारी असोसिएशन, सातारा मिठाई संघटना, किराणा रिटेलर्स असोसिएशन, सातारा, सातारा शहरातील सर्व रिक्षा चालक मालक संघटना, सातारा हॉटेल मालक संघटना, साहस असोिएशन सातारा (सॅनिटरी वेअर, हार्डवेअर व पेेंटस), सातारा मेडिकल होलसेल व रिटेल असोशिएशन, सातारा बुल सेलर्स स्टेशनरी असोिएशन, महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा संस्था, मे.अक्षय लांडगे अॅण्ड कंपनी, वसंतशेठ जोशी (चंद्रविलास भुवन), भरतशेठ राऊत (जीलेबीवाले), एन.जीवनराज युनिफॉर्म, बालविकास मंडळ, शनिवार पेठ, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट, अनंत सायकल कंपनी, सौरभ रायरीकर यांचा सहभाग आहे. या अभियानाला सातारा नगरपालिकेचे विशेष सहकार्य आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |