02:33pm | Aug 02, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संकटाने आधीच सर्वजण त्रस्त झाले आहेत. घरातून बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडताना जय्यत तयारीने कोरोनाशी मुकाबला म्हणून मास्क, सॅनिटायझर चा वापर केला जातो. परंतू आता नाईलाजास्तव रस्त्यावरुन चालताना हातात काठी घेण्याची गरज वयोवृद्धांसोबत महिला व तरुणांना भासू लागली आहे. बेवारस कुत्र्यांच्या मेळ्याने सातारकर नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालकांना धास्ती, तर आया-बहिणी भीतीग्रस्त झाल्या आहेत. यावर लवकरच उपाययोजना व्हावी, अशी मागणी महिलावर्ग करु लागला आहे.
सातारा जिल्ह्यात गटारी नंतर बकरी ईद असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त मांसाहाराचे जेवण अनेकठिकाणी झाले आहे. मांस आणि हाडाचा खाद्यपदार्थ म्हणून शोध घेणार्या भटक्या कुत्र्यांना ही तर मेजवानीच ठरली आहे. आता हे दोन्ही सण पार पडले असले तरी खाद्यपदार्थांच्या शोधात बेवारस कुत्री रस्त्यांवर मोकाट हिंडू लागली आहेत. सातारा शहरातच सुमारे 5 हजारांच्या आसपास भटकी कुत्री वावरत आहेत. काही ठिकाणी लहान मुले व वयोवृद्धांवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला आहे, एखाद्या फुटकळ भाईच्या मागे हिंडणार्या टोळक्यासारखी अवस्था या भटक्या कुत्र्यांकडे पाहताना जाणवू लागली आहे. रात्रीच्या निरव शांततेत अचानकच वाहनचालकांच्या मागे लागणार्या या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या अपघातात वाहनचालक जरी जखमी झाले तरी दाद मागणार कोणाकडे? या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडे ना जिल्हा परिषद लक्ष देते, ना नगरपालिका याकडे पाहते. वास्तविक पाहता नागरिकांकडून कर वसूल करताना पालिकेने नागरिकांच्या संरक्षणाचा भाग म्हणून या भटक्या कुत्र्यांच्या संख्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र सातारा शहरात तसे होताना दिसत नाही. या भटक्या कुत्र्यांना भलेही न मारोत, मात्र त्यांचे निर्बिजीकरण तरी पालिकेला करता येणे शक्य आहे.
या भटक्या कुत्र्यांची सातारा शहरातील संख्या पाहता कोणीही भीतीने थरथर कापेल. मात्र, त्याचे पालिकेला काहीही देणेघेणे दिसत नाही. चारचाकी वाहनधारकांना याचा धोका कमी असतो. मात्र दुचाकीवर असलेल्या प्रवाशांची मात्र या भटक्या कुत्र्यांमुळे भंबेरी उडते. यांना चकवा देण्याच्या नादात दुचाकी कधी घसरते, तर कधी नाल्यात जाते. यामुळे अनेक वाहनचालक जायबंदीही झाले आहेत. लहान मुलांना याचा धोका जास्त असतो. त्यात लॉकडाऊनमुळे भुकेलेली ही भटकी कुत्री कोणावर, कसा हल्ला चढवतील, हे सांगता येत नसल्याने सातारकरांचे लॉकडाऊन उठल्यानंतरही घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
सातार्यात प्राणीमित्रांची संख्या जास्त असली तरी अशा गंभीर प्रसंगी माणूस आणि मानवता नजरेसमोर ठेवून मुक्या प्राण्यांवर दया करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे माणसाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांच्या पालकांनी केलेली आहे. या भटक्या कुत्र्यांच्या वसवसपणामुळे रस्त्यावर बेवारस असणार्या व्यक्तींनाही त्याचा फटका बसत आहे. एका बाजुला कोरोनाची भीती, तर दुसर्या बाजूला भटक्या कुत्र्यांची भीती. अशा कात्रीत सातारकर सापडलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याचे काम कोण सामाजिक कार्यकर्ता निष्ठापूर्वक करेल, त्याची प्रतिक्षा होवू लागली आहे. पालिकेकडून या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी वेळ पडल्यास भीक मांगो आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे निलेश नलवडे, महारुद्र तिकुंडे व फारुख पटनी यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |