नवी दिल्ली: मराठा आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारकडून प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने जर 8 मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणीचा कालावधी निश्चित केला असून 8 मार्च ते 18 मार्चदरम्यान ही सुनावणी पार पडणार आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यानच सकारात्मक संकेत देत तीन ते चार आठवड्यांनी यावर सुनावणी सुरु करु म्हणजे तोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली असेल असं सांगितलं होतं. राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली होती.
व्हर्च्यूअल सुनावणीत अडचण येत असून प्रत्यक्ष सुनावणी व्हावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीचं वेळापत्रक आखून दिलं आहे. यामध्ये पहिली वेळ मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 8,9 आणि 10 तारखेला ते आपली बाजू मांडतील. यानंतर 12, 15, 16 आणि 17 तारखेला ज्यांचं समर्थन आहे असे लोक म्हणजेच मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव तसंच इतरांना वेळ देण्यात आली आहे. 18 तारखेला केंद्राच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे. 8 ते 18 मार्च या कालावधीत प्रत्येकाला आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सादर करायचं आहे, अशी माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |