05:35pm | Mar 20, 2023 |
सातारा : पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी ठाणे येथील माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.
रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तसेच गाडीचा झालेला अपघात यावरून वाद सुरु होता. यावेळी मदन कदम यांच्या घरी गेलेल्यांवर गोळीबार झाला. या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत पाटण येथील गोळीबार प्रकरणात करण्यात आलेल्या तपासाबाबत महत्वाची माहिती दिली. यावेळी समीर शेख म्हणाले की, पाटण तालुक्यातील मोरणा खोर्यात रविवार, दि. १९ रोजी शिद्रुकवाडी येथे काही कारणांनी युवकाची भांडणे झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका गाडीचा अपघात झाला होता. त्यावरून हि भांडणे सुरु होती. हा वाद सुरु असताना काल पुन्हा गाडीच्या अडवण्यावरून भांडणे सुरु झाली. यावेळी झालेल्या वादावादीत आरोपीचे साथीदार त्या ठिकाणी आले आणि यावेळी मुख्य आरोपी मदन कदम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये दोन लोकांना गोळ्या लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी गोळ्या लागलेल्यांसोबत एक व्यक्ती घटनास्थळी उपस्थित होती. ती व्यक्ती जखमी झाली असून त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीची सध्या प्रकृती ठीक आहे.
या गोळीबार प्रकारणी मुख्य आरोपीवर 302 कलमान्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयासमोर त्यांना हजर केले जाणार आहे. तसेच गावात जे काही लोक आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेण्यात आली असून गावात शांतता ठेवण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गावात सध्या शांतता असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |