सातारा : कोरोना संकट काळातील सरकार पुरस्कृत सामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी हे निवेदन दिले असून त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील जनता गेले ४ ते ५ महिने कोरोना सारख्या संकटांना सामोरे जात आहे. शासनाने ज्या ज्या सूचना केल्या त्यांचे पालन करून आपले दैनंदिन जीवन जगत आहे. सुमारे तीन महिन्याच्या संचार बंदीमुळे सर्वसामान्य जनता मोडकळीस आली असतानाच आता सरकार काम करू देईना आणि बाप भीक मागू देईना अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. सद्यपरिस्थितीत पेट्रोल-डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ ही जनतेची एक प्रकारे लूटच आहे. या दरवाढीमुळे वाहतूक दरात वाढ होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. संचार मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहनांवर दंड आकारणी करण्यात आली. कोणतीही पार्किंगची व्यवस्था नसताना संबंधित यंत्रणेकडून क्रेनच्या सहाय्याने वाहने उचलून घेऊन नेहली जात आहेत. सध्या तर डबलसीट दुचाकी चालकाला अडवून त्याला दंड आकारणी केली जात आहे, ही फार गंभीर बाब आहे लोकांना दैनंदीन जीवनासाठी दुचाकीचा वापर करावा लागतो, त्यासाठी रोज होणारी पेट्रोलची दरवाढ आणी नंतर पोलीसांचा दंड यामुळे जनता त्रस्थ झाली आहे. हे कमी का काय म्हणून वीज वितरण कंपनीने वाढीव वीज बिले आकारून जनतेला सळो की पळो करून सोडले आहे.
कोरोना संकट काळात शासनाने पेट्रोल-डिझेलची दरवाढ, पोलिसांचा दंड, वाढती महागाई, वाढीव वीज बिले यामध्ये हस्तक्षेप करून सर्वसामान्य जनतेची सरकार पुरस्कृत होणारी लूट तातडीने थांबवावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा यांच्यावतीने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |