03:47pm | Dec 26, 2020 |
मेलबर्न : दुसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखल्यानंतर भारताने सावध सुरूवात केली आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमावत 36 धावा केल्या आहेत. मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मयांक अगरवालच्या रुपात धक्का बसला. मयांक शून्यावर बाद झाला. मात्र नंतर शुभमन गिल आणि पुजाराने सावधपणे खेळत पडझड होऊन दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शुभमन गिल 28 तर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. शुभमन गिलने 5 चौकारांसह 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कनं एक विकेट घेतली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला सलामीवीर बर्न्स शून्यावर बुमराहचा शिकार ठरला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशनेनं सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर हेडनं 38 तर वाडेनं 30 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांपुढं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.
टीम इंडियाकडून बुमराहनं चार, अश्विननं 3, सिराजनं 2 तर रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली. टीम इंडिया दुसर्या कसोटी समान्यात विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.
दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आहे. या सामन्याद्वारे शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. दुखापत झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. त्याने या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं आहे. याशिवाय भारतीय संघाने रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला परत बोलावलं आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर अतिशय दबाव आहे, कारण पहिल्या कसोटीच्या दुसर्या डावात भारताचा डाव केवळ 36 धावांवर आटोपला होता.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |