01:49pm | Jul 04, 2022 |
मुंबई : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसून आले होते. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतदारांनीही मतदानाला दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४६ आमदारांनी मतदान केले. तर सात आमदार विविध कारणांमुळे मतदानाला उपस्थित राहू शकले नव्हते. यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक ते तुरुंगात आहेत. मात्र इतर आमदारांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याव्यतिरिक्त दत्तात्रेय भरणे, बबन शिंदे, निलेश लंके, दिलीप मोहिते आण अण्णा बनसोडे हे आमदार विधान सभा अध्यक्षांच्या निवडणुकीला अनुपस्थित होते. त्यापैकी दत्तात्रेय भरणे हे आईच्या निधनामुळे येऊ शकले नाहीत. तर दिलीम मोहिते आणि अण्णा बनसोडे हे उशिरा आल्याने मतदान करू शकले नाहीत. तर निलेश लंके हे आजारी असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आज विश्वास प्रस्तावावेळी हे आमदार काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचं लक्ष असेल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |