भुईंज : कोरोना काळात जमावबंदीचा आदेश असतानाही सोशल डिस्टिन्सिंगचे पालन न करता, नाका-तोंडावर मास्क न लावता विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सुमारे 22 जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाढदिवस साजरा करणाऱ्यांना भुईंज पोलिसांनी हिसका दाखवत त्यांची वरात पोलिस ठाण्यात आणली. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून त्यामध्ये काही जणांनी चॅनल ला काम करत असल्याची फुशारकी मारल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकार्यांनी कोरोना रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असताना भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या ग्राऊंडवर रविंद्र जाधव यांचा वाढदिवस करण्याकरिता कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गणेश शिंदे, आशुतोष जाधव, राहुल शिंदे, सिद्धार्थ कांबळे, राहुल घाडगे, प्रवीण लोहार, विठ्ठल भोसले, विक्रम जाधव, सुचित पिसाळ, रोहित पवार, समीर मेंगळे, निलेश पोतदार व त्यांच्या अनोळखी 8 ते 10 साथीदारांनी तोंडावर व नाकावर मास्क न लावता सोशल डिस्टिन्सिंगचे पालन न करता जमले होते. याची माहिती भुईंज पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी अनेकांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी अनेकांची धरपकड केल्याने युवकांची तंतरली.
संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कोव्हिड 19 साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पळून गेलेल्यांच्या पोलिस शोध घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |