सातारा : सातारा-कोरेगांव पुसेगांव पंढरपुर एन.एच.५४८ सी रस्त्याचे कोरेगांव शहरातील रस्त्याचे काम बरेच वर्षे रखडले आहे. तसेच सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.वाहतूक नियंत्रण नसल्याने नेहमी होणारी वाहतूक कोंडी हे लोकांच्या जिव्हळ्याचे विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने कोरेगावात मध्यवर्ती जुना स्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक चे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. सातारा पंढरपूर रोड तातडीने झालाच पाहिजे. 3वर्षे रखडलेल्या रस्त्याला जबाबदार कोण.होणारे अपघात टाळा अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालया पर्यंत गेला. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, संजना जगदाळे, श्रीमंत दादा झांझुरणे, श्रीमंत भाऊ झांजूर्न, अरुण माने, डॉ गणेश होळ,प्रतिभा बर्गे, संजय पिसाळ, नाना भिलारे, अजय कदम,अमर बर्गे किशोर बर्गे, संजीवनी बर्गे, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे, नितीन लावंगरे, अजित बर्गे, सचिन बर्गे, सनी शिर्के, माधुरी चव्हाण, मंदा बर्गे, संगीता बर्गे, प्रभाकर बर्गे, सागर बर्गे, ॲड. सुनील भोसले, फर्दिन मुजावर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने शहरातील नागरीकांना, वाहनधारक दुकानदार, व्यापारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वारंवार अपघात होऊन जिवित हानी होत आहे.
वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुक नियंत्रण यंत्रणा सम-विषम पार्कीग टोईंग यंत्रणा बंद असल्याने जनतेच्या हाल अपेष्टांमध्ये अजुनच भर पडत आहे. सदर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सतत होणाऱ्या वित्तहानीसोबत जीवितहानीला तोंड द्यावे लागत असून प्रशासनातर्फे कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. मा. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदनही कोरेगाव तालुका तहसीलदार, प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |