09:53pm | Jun 10, 2023 |
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन सातारा जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या नावावर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध पद भोगणारे गायब असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, मुंबई मार्केट कमिटी अशा शासकीय व अशासकीय समित्या तसेच मंत्रिपदापर्यंत अनेकांनी सातारा जिल्ह्यात पदे भोगली. मात्र ज्या पक्षाचा वर्धापन दिन जिल्हा कार्यालयात साजरा होत असताना हेच पद भोगलेली नेते गायब असल्याचे चित्र आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा नियोजन समिती अथवा विविध निवडणुकीत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सातारा जिल्हा कार्यालयात तोबा गर्दी होते. मात्र वर्धापनदिनी कार्यालयाकडे आपण पाठ का फिरवतो, याचे भान पद भोगलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना नसून या असल्या जिल्ह्यातील नेत्यांवर निवडणुकीदरम्यान भाकरी फिरणार का, हा येणारा काळा सांगेल. राज्यातील नेते जिल्ह्यात सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा हा सातारा जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे. मात्र याच बालेकिल्लाला आता पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच गळती लागल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे राष्ट्रवादी कार्यालयात अथवा सातारा जिल्हा दौऱ्यावर असले की त्यांच्या पुढे-मागे करणारे बरेच जिल्ह्यातील कार्यकर्ते आपल्याला दिसून येतात. आपली पक्षावर व नेत्यावर किती निष्ठा, प्रेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या देहबोलीतून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न करताना दिसून येतात. नेत्यांच्या पुढे-मागे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते समज देणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |