01:09pm | Aug 04, 2020 |
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून गोळीबार मैदान, रामराव पवार नगर या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही वन विभाग लक्ष देत नाही. वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा येत्या १५ ऑगस्टला वन विभागाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन- तीन वर्षांपासून रामराव पवार नगर, गोळीबार मैदान, अजिंक्यतारा लगतच डोंगर, दक्षिण दरवाजा या भागात बिबट्याचा वावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या नागरी वस्तीत दिसू लागला आहे. या बिबट्याने अनेक कुत्री फस्त केली आहेत. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे त्याच भागात असंख्य लोक दररोज फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉक साठी जात असतात. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकदा तोंडी, लेखी कळवूनही वन विभाग गांभीर्याने घेत नाही. तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात वन विभागाने सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरु करावी. अन्यथा जनहितासाठी वन विभागाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी त्यांच्याच कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करू, असा इशारा रवी पवार यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |