12:51am | Jul 07, 2020 |
सातारा : येथील सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता प्रकाश दत्तात्रय उर्फ पी.डी. जाधव याला लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीशी घालत असणार्या सातारा शहर पोलीस ठाण्यातील सपोनि धोंडिराम वाळवेकर याच्यावर 25 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सातार्यातील लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई केली असून यामध्ये शहर पोलीस ठाण्यातीलच मोठे मासे एसीबीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सातारा येथील कृष्णा खोरे महामंडळांतर्गत येणार्या सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता प्रकाश दत्तात्रय उर्फ पी.डी. जाधव याने गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच्याच विभागात कार्यरत असणार्या महिला कर्मचार्यांचा विनयभंग केला होता. त्यासंदर्भात त्याच्याविरोधात संबंधित महिलांनी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात केली होती. याचा तपास सपोनि धोंडिराम वाळवेकर याच्याकडे देण्यात आला होता. मात्र पीडितांच्या आरोपानुसार सपोनि वाळवेकर याने लिंगपिसाट कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव याच्याबरोबर अर्थपूर्ण तडजोडी करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. परंतू सातार्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी लिंगपिसाट कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर सातारा पोलीस प्रशासनाला पीडित महिलांची तक्रार दाखल करुन घ्यावी लागली होती. यामुळेच पी.डी. जाधव वर सहकारी महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विनयभंग तसेच ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, हे गुन्हे सपोनि वाळवेकर याने पी.डी. जाधव बरोबर अर्थपूर्ण तडजोडी केल्या नसत्या तर 4 महिन्यांपूर्वीच दाखल झाले असते. परंतू लिंगपिसाट पी.डी. जाधव ला पैशाच्या लालसेने मदत करणार्या सपोनि धोंडिराम वाळवेकर याचा बुरखा टराटरा फाटला असून सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराकडे चक्क 25 लाखांची लाच सपोनि वाळवेकर याने मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सिद्ध झाल्याने सातारा एसीबीने सपोनि वाळवेकरच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एसीबीकडून सविस्तर तपशील मिळाला नसल्याने सपोनि वाळवेकरची भानगड तपशीलात देता येत नाही. मात्र, सातार्यातील सिंचन विभागात ‘चार्ल्स शोभराज’ लीला रचणार्या पी.डी. जाधव ला केवळ पैशाच्या मोबदल्यात लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये पाठिशी घालणारा सपोनि वाळवेकर वरच एसीबीचा दंडुका पडल्यामुळे पी.डी. जाधव व त्याची फेसबुक व सोशल मीडियावर वळवळणार्या पिलावळींना यानिमित्ताने जबर दणका बसला आहे. येत्या काळात कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव, सपोनि वाळवेकर तसेच त्याच्या दुष्कृत्याला पाठिशी घालणार्या पिलावळीही पोलिसांच्या रडारावर येणार आहे.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |