11:38pm | Jul 29, 2021 |
सातारा : कोरोनामुळे सातारा पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असताना आता विकासकामांवरही काहीसा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत सातारकरांच्या विकास कामांना मंजूरी देणाºया पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामांवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. शेवटच्या क्षणाला सर्वसाधारण व स्थायीची सभा रद्द होत असल्याने आघाडीत पुन्हा एखदा बिघाडी झाली की काय? अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. पालिका निवडणुकीला साडेचार वर्षांचा कालावधीत पूर्ण झाला असून, आगामी निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून राजकीय पक्षांची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सातारा पालिकेतील सत्तारुढ सातारा विकास आघाडीने आघाडी प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा वचननाम्याप्रमाणे विकास साधण्याचा पुरेपूर प्रत्यत्न केला आहे. ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची, पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, भुयारी गटार योजने, पंतप्रधान आवास योजना अशा महत्वाच्या कामांना त्यांनी गती दिली. मात्र, कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षांत पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामे मार्गी लावण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. नगरपालिका अधिनियमाप्रमाणे पालिकेची महिन्याला एक सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे. मात्र, जानेवारी २०२० ते जुलै २०२१ या दीड वर्षांच्या कालावधीत झालेल्या दहा सभांपैकी केवळ तीनच सभा सर्वसाधारण होत्या. तर चार विशेष सभा या स्वीकृत नगरसेवक, सभापती व उपनगराध्यक्ष निवड तर एक विशेष सभा ही पालिकेच्या बजेट मंजूरीची होती. पालिकेची शेवटची आॅनलाईन सर्वसाधारण सभा दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. तर दि. ८ एप्रिलची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. तर दि. २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची सभा देखील कोरमअभावी रद्द करण्यात आली. सभेची पूर्वकल्पना दिली असताना शेवटच्या क्षणी अनेक पदाधिकाºयांनी सभेला दांडी मारली. पालिकेच्या सभा जर वेळेवर झाल्या तर सातारा शहरातील विकासकामे वेळेत मार्गी लागतील. मात्र, कोणत्या न कोणत्या कारणाने सभा रद्द होत आहेत. आगामी सर्वसाधारण सभेलाही अद्याप मुहूर्त न मिळाल्याने विकासकामे मार्गी लावण्याचे सत्ताधाºयांपुढे आव्हान असणार आहे.
अनेक कामे रखडली
जलतरण तलाव अद्ययावतीकरण, शहरातील मंडईचे प्रशस्तीकरण, रस्ता रुंदीकरण व पॅचिंग, पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे फेरलिलाव, खुल्या जागांची भाडे निश्चिती, नवीन प्रशासकीय इमारत तसेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, सभाच होत नसल्याने ही विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |