वडूज : खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाची वेगवान पद्धतीने लाट सुरू झाली असून रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर खटाव तालुक्यातच उपचार होणे गरजेचे आहे. सध्या वडूज ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर बंद आहे, यंत्रसामग्री धूळखात पडून आहे, त्याच्या देखभाल दुरूस्ती कडे संबधित यंत्रणेचे लक्ष नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या सेंटरचा वापर होत नसल्याने कोरोनाचे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .तसेच महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार करणे सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.कोरोना प्रादुर्भावा मूळे अनेक लोकांचे रोजगार गेल्याने लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
वडूज ता खटाव येथील जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करावे व रुग्णांना आधार दयावा अशी मागणी मनसेचे सुरज लोहार यांच्यासह मनसे कार्यकर्त्यानी खटाव तालुक्यातून प्रथम केली आहे. हे सेंटर सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांना त्याकाळी मोफत नाष्टा देऊन लोहार व मित्र मंडळाने माणुसकी जपली होती. त्याचीही यानिमित्त आठवण करून देण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना मनसेचे मंगेश पवार, महेश देसाई, हणमंत पवार, अविनाश लोहार, निलेश लोहार आदीसह मनसे सैनिक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |