05:27pm | Aug 12, 2022 |
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी उपोषण केलं होतं. ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर ज्यांनी उपोषण सोडताना आश्वासन दिलं ते एकनाथ शिंदें मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री यांना सगळं माहिती आहे. ते मराठा समाजाचे आहेत. आरक्षणासाठी आपल्याला परत लढायला लागेल, पुन्हा लढा उभारावा लागेल, असं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
दीपक केसरकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची आज पुण्यात भेट झाली त्यावेळी ते बोलत होते. नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी इच्छा आहे. रायगडासोबतच महाराष्ट्र पर्यटन देशभरात पोहचण्याची गरज आहे. त्यांच्या मार्फत महाराष्ट्र देशभरात पोहचेन अशी अपेक्षा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे
मराठा समाजाला मूलभूत सुविधा द्याव्यात. मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवण्यासाठी आयोगाची नेमणूक करण्यात यावी. त्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आणि समाजाचे प्रश्न सोडवावे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही आमंत्रित करण्यात यावे. मराठा आरक्षणाची सगळी प्रोसेस परत करावी लागणार आहे. मागासवर्गीय आयोग स्थापन करावे लागणार आहेत, असंही ते म्हणाले.
शिवसेनेने शब्द पाळला नाही.
शिवसेनेने खासदारकी दिली नाही. हा माझ्यासाठी इतिहास झाला आहे. शिवसेनेने शब्द पाळला नाही. माझी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मात्र आता स्वराज्यच्या माध्यामातून अनेक सामाजिक कामं हाती घेतले आहेत. विस्तापित, गरजू, गरीबांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वराज्यच्या माध्यमातून राजकीय पक्ष काढणं सोपं नाही. त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. त्या सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र प्रश्न सुटले नाहीत तर नक्कीच पक्ष काढायचा विचार करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उदयनराजे यांची देखील भेट
प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना माझी आहे, असं मी म्हणू का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. दीपक केसरकर यांनी आज पुण्यात संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |