सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे तालुका कराड गावच्या हद्दीत तळबीड पोलिसांनी शुक्रवारी रात्री 11 ते 4 दरम्यान रात्रगस्त सुरू असताना कर्नाटक राज्यातून आलेल्या टेम्पोतून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत अशोक लेलँड टेम्पो सह 25 लाख 12 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
विलास बलु जाधव वय 45 राहणार निगडी, तालुका पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे. मूळ राहणार सोनवडी, तालुका जत, जिल्हा सांगली आणि सचिन संजय रेड्डी राहणार कुमठा, तालुका औसा, जिल्हा लातूर. सध्या राहणार चिखली, जिल्हा पुणे या दोघांविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस बोरोटे यांना कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. तासवडे टोल नाका येथे तळबीड पोलिसांनी सापळा रचून एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टोल भरून जात असताना थांबवून ताब्यात घेतला. मात्र या प्रयत्नात टेम्पो भरधाव वेगात पुढे गेला. पोलिसांनी पाठलाग करून वराडे तालुका कराड या गावच्या हद्दीत टेम्पो ताब्यात घेऊन ड्रायव्हरची चौकशी केली तेव्हा विमल गुटखा व वी-वन कंपनीची तंबाखू अशी एकूण 42 पोती या कारवाईत मिळून आली. यामध्ये विलास जाधव व सचिन रेड्डी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस एम पिसाळ करत असून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमध्ये आर आर बोरोटे पोलीस फौजदार खराडे पोलीस हवालदार होंबासे पोलीस कॉन्स्टेबल विभूते पोलीस शिपाई साळुंखे संजय मोहिते अशोक गायकवाड यांनी या कारवाईत भाग घेतला होता.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |