मुंबई : संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना यांच्यात समेट झाला असून राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंना राज्यसभेत पाठविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी संभाजीराजे यांची मागणी ठाकरे यांनी अखेर मान्य केली.
संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याने या वादावर तोडगा निघाला आहे. संभाजीराजे माध्यमांशी बोलणार असून याबाबत ते अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी सेनेचे नेते प्रयत्न करत होते. शिवसेनेने अपक्ष आमदारांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे हे शिवसेनेचे २२ वे आमदार म्हणूनच कार्यरत राहतील, अशी अट त्यांना ठेवण्यात आली होती. त्यावर राजे समाधानी नव्हते. एका पक्षाशी बांधिलकी त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे सर्वपक्षीय किंवा महाविकास आघाडीचा एकमताने उमेदवारी घेण्यासाठी त्यांचा आग्रह होता. शिवसेनेने अखेर त्यांचा आग्रह मान्य केला आहे.
या दोघांत समेट झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहाही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काॅंग्रेस यांचे प्रत्येकी एक जण राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकतो. भाजपचे दोन जण राज्यसभेचे खासदार होऊ शकतात. सहाव्या जागेवर संभाजीराजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार होतील. या साऱ्या निवडणुकीवर तोडगा निघाल्याने अपक्ष आमदारांचा भाव कमी झाला आहे. निवडणूक होण्याच्या शक्यतेने दोन्ही बाजूंनी अपक्ष आमदारांशी संपर्क साधून त्यांनी पाठिंबा द्यावा,यासाठी फिल्डिंग लावण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |