09:41pm | Dec 01, 2021 |
फलटण : महालक्ष्मी या नामांकित कंपनीची पिठाच्या चक्कीचे स्टिकर लावून ती चक्की फलटण शहरातील एकाला विकण्यात आली. त्यानंतर ती चक्की बंद पडल्याने संबंधितांनी थेट कंपनीशी संपर्क साधून माहिती घेतली असता फलटणमधील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानदाराने चक्क बोगस चक्की गळ्यात मारल्याचे त्या ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत माहिती अशी, रोहित माने (रा. जाधववाडी, ता. फलटण) यांनी दि. 29 जुलै 2021 रोजी फलटणमधील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून सुमारे 13 हजार 500 रुपये किंमतीची महालक्ष्मी या आयएसआय प्रमाणित ब्रॅण्डची आटा चक्की खरेदी केली होती. परंतू खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच ही आटा चक्की बंद पडू लागली. तसेच धान्य दळल्यानंतर त्या धान्याचे पीठही व्यवस्थित येत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स च्या मालकांशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, तुमची मशीन वॉरंटी पिरीयडमध्ये आहे, मी तुमची मशीन दुरुस्त करुन देवू शकतो. परंतू दुरुस्त करुनही आटा चक्की व्यवस्थित न चालल्याने शेवटी कंटाळून माने यांनी महालक्ष्मी कंपनीच्या ग्राहकसेवा क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी आपली तक्रार नोंदवली. महालक्ष्मी कंपनीने त्यांना त्या आटा चक्कीचा फोटो तसेच इतर बाबी पाठविण्यास सांगितल्या. त्यानंतर महालक्ष्मी कंपनीने तपासणी केली असता ही आटा चक्की आमच्या कंपनीची नसून कोणीतरी आमच्या कंपनीचे स्टिकर वापरुन तुम्हाला बोगस आटाचक्की दिलेली आहे, असे सांगितल्यानंतर माने यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत टाळाटाळीची उत्तरे देत तेथून काढता पाय घेतला. यानंतर माने यांनी वारंवार संपर्क करुनही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स च्या मालकाने त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. केवळ पैसा कमविण्याच्या हेतूने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स च्या मालकाने आपली फसवणूक केली असल्याचा दावा माने यांनी केला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स ने मला जसे फसवले, तसेच इतर हजारो ग्राहकांनाही फसवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फसवेगिरी करणार्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही माने यांनी केली आहे. तसेच इतर ग्राहकांची जर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स ने फसवणूक केली असल्यास त्यांनीही थेट ग्राहक न्यायालयात दाद मागावी, अशी मागणी फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |