12:18pm | Jun 29, 2020 |
कराची: पाकिस्तानमध्येे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. दहशतवाद्यांनी कराचीतील शेअर बाजाराला टार्गेट करत हा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. शेअर बाजार इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवळपास चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
कराची शेअर बाजारावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे. या दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवादी सामिल असल्याची माहिती सीसीटीव्हीतून समोर आली आहे. हे चारही दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या चकमकीत ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दहशतवादी ठार करण्यात आले असून एक अद्यापही इमारतीत लपला आहे. दहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात एक पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. स्टॉक एक्सेंजमध्ये ग्रेनेडचाही वापर करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणार्या दरवाजाने बाहेर काढलं जात आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्जेंमध्ये दुर्देवी घटना घडली आहे, असं ट्विट स्टॉक एक्स्चेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी केलं आहे. पार्किंगमधून मार्ग काढत ते घुसले आणि दिसणार्या प्रत्येकावर गोळीबार केला असं त्यांनी सांगितलं आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |