सातारा : आयुष्यात असंख्य अडचणी येतात. मात्र मनात यश मिळविण्याची जिद्द असेल तर अडचणी कधीच अडथळे होऊ शकत नाहीत. असेच काहीसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतापदी कार्यरत असणार्या संतोष शेलार यांच्या बाबतीत घडले आहे.
संतोष शेलार हे सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आर्थिक खर्च करण्याचीही त्यांची ताकद नव्हती म्हणून त्यांनी डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी महाविद्यालयाचे प्रा.शेख प्रा.चिरमुले आणि प्रिन्सिपल गोपाळ देव दूतासारखे पाठीशी उभे राहिले. त्यांनी संतोष यांची बाजू महाविद्यालयात खंबीरपणे मांडली. संतोष यांना सगळीकडूनच मोलाची मदत मिळाली आणि संतोष यांनी अडचणीचे गाठोडे पायाखाली घेऊन स्वतःची उंची वाढवली.
असे म्हणतात की, जिद्दीचे मोठे बळ असते आणि गुणवत्तेला न्याय मिळतो म्हणूनच संतोष शेलार यांनी डिप्लोमामध्ये महाराष्ट्रात दुसरे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पुणे विद्यापीठात दुसरे व एम. ई.स्ट्रक्चरमध्ये पुणे विद्यापीठात पहिले आले आहेत. एम.पी.एस.सी. सिव्हिल इंजिनिअर सर्विसेसमध्ये महाराष्ट्र राज्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शेलार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे.
सध्या संतोष शेलार महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भिवडी या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेऊन एवढे मोठे यश संपादन केल्यावर संतोष शेलार यांच्या या यशाचा सातारकरांना खरोखरच सार्थ अभिमान आहे. एवढे मोठे यश संपादन करूनही संतोष शेलार यांचे पाय जमिनीवरच आहेत. तसेच सर्वांना बरोबर घेऊन त्यांची काम करण्याची सचोटी पाहून खूप कौतुक वाटते. त्यामुळे संतोष शेलार यांच्या पुढील वाटचालीसाठी के.बी.पी. इंजिनिअरिंग कॉलेज ग्रुप 1995 व समस्त सातारकरांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |