11:29pm | May 22, 2020 |
सातारा : जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचा रेट झपाट्याने वाढत आहे. आज दुपारी 8 कोरोना बाधित खडखडीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, जिल्हावासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज सकाळीच एक कोरोना बाधित, तर तीन अनुमानितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आज संध्याकाळी उशिरा तिघांपैकी दोघांचा मृत्यू अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे, तर पाचगणीतील महिला मृतकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज दुपारी सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे. या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 पुरुष व 45 वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. दरम्यान, आज सकाळी जावली तालुक्यातील 58 वर्षीय व्यक्तीवर कोरोना बाधित निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. संबंधित व्यक्तीला मधुमेह तसेच श्वसनसंस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळेच त्याचा कोरोना तसेच वरील आजाराने मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली होती. तसेच वरळी, मुंबई येथील 64 वर्षीय महिला पाचगणी येथे आली होती. त्यामुळे तिला महिला गृह विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. असे असताना आज सकाळी या महिलेचा दम्याच्या आजाराने व हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली असून कोरोना अनुमानित असल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तथापी तिचा अहवाल रुग्णालय प्रशासनाला अद्याप मिळालेला नसल्याने तिच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने घाटकोपर मुंबई येथून आलेल्या दोन महिन्याच्या बाळाला कोरोना अनुमानित म्हणून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाला होता. कोरोना अनुमानित असल्याने त्या बाळाच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज संध्याकाळी उशिरा त्या बाळाच्या मृत्यूचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा मृत्यू श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे झाला आहे. दरम्यान, त्या बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नांदलापूर, ता. कराड येथील साठ वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोना अनुमानित म्हणून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्या महिलेचाही आज सकाळी मृत्यू झाला आहे. तिचाही अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात आजच्या कोरोना बाधिताच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना मृतकांची संख्या 5 झाली आहे, आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण न सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काल इतकीच म्हणजे 201 आहे. आज कोरोनातून ठणठणीत बर्या झालेल्या आठजणांना डिस्चार्ज दिल्याने कोरोना मुक्तांची एकूण संख्या 114 इतकी झाली आहे. तर एक्टिव्ह कोरोना बाधित म्हणून जिल्ह्यातील रुग्णालयात 82 जण उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोरोना बाधितांचे शहर म्हणून ओळखले जाणारे कराड शहर मात्र शंभर टक्के कोरोना मुक्त झाले आहे. त्यामुळे कराडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सातारा शहर, तालुक्यातील कंटेनमेंट झोन वगळून नॉन रेड झोन नुसार शिथिलता
सातारा शहर आणि तालुक्यात जिथे बाधित रुग्ण आढळून आले ते सदरबझार, गार्डनसिटी, प्रतापगंज पेठ, कारागृह, गेंडामाळ, कोडोली (शिवाजीनगर) आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार नॉन रेड झोन प्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. वरील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रामध्ये जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा तालुक्यात लॉकडाउन मध्ये उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर, सातारा मिनाज मुल्ला यांनी शिथिलता दिली आहे.
केश कर्तनालय, ब्युटी पार्लरना सशर्त परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन झाल्यानंतर राज्यातील केश कर्तनालये व ब्युटी पार्लरची शटर्स डाऊन झाली होती. त्यामुळे गेल्या साठ दिवसांमध्ये अनेकांच्या सौंदर्याची दुर्दशा झाली होती. मात्र सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केश कर्तनालय व ब्युटी पार्लरना सशर्त परवानगी देवून जिल्हावासियांना सुखद धक्का दिला आहे.
यामध्ये केश कर्तनालय, ब्युटी पार्लरमध्ये येणार्या ग्राहकांसाठी दुकानांमध्ये ग्राहकांच्या नोंदणीसाठी रजिस्टर ठेवणे सक्तीचे केले आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी जाण्याअगोदर आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. दुकानांतील खुर्च्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. दुकानात येणार्या ग्राहकाचे केस कापतेवेळी व दाढी करतेवेळी संबंधित ग्राहक मास्क लावू शकत नसल्याने संबंधित कामगारांनी स्वत:च्या चेहर्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानात वापरली जाणारी उपकरणे, अंगावर टाकला जाणारा टॉवेल हा एकाच ग्राहकाला वापरणे बंधनकारक आहे, तो दुसर्या ग्राहकाला वापरु नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दुकान आणि दुकाना बाहेरील परिसर निर्जंतुक करणेही त्या दुकान चालकाला बंधनकारक असणार आहे. अशा विविध अटी घालून जिल्हाधिकार्यांनी उद्यापासून केश कर्तनालय, ब्युटी पार्लर्सना सशर्त परवानगी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |