वाई : कोरोना संकटकाळाने बंद असलेली धार्मिक स्थळे, मंदिरे खुली करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मंदिर परिसरात होणार्या गर्दीचा फायदा घेत चोरटे चोरी करत असतात. धार्मिक स्थळावरील अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाई शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मांढरदेव गडावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत माधुरी लक्ष्मण डुकळे (वय 25 वर्षे) धंदा-मजूरी रा.वाघेश्वरमंदिर वाघोली पुणे, रेश्मा अनिल जाधव (वय-40वर्षे) धंदा-मजूरी रा.वाघेश्वरमंदिर वाघोली पुणे, पुजा धनाजी पवार (वय-25 वर्षे) धंदा-मजूरी रा. पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली पुणे, कमलाबाई मोहन जाधव (वय-50 वर्षे) धंदा-मजूरी रा.पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली पुणे, सुरेखा रमेश पवार (वय-40 वर्षे) धंदा-मजूरी रा.पाटीलवस्ती, केसनंद, वाघोली पुणे, दिपाली हिरामण सुकळे (वय-25 वर्षे) धंदा-मजूरी रा.पाटीलवस्ती,केसनंद, वाघोली पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर वाई पोलीस ठाणे अंतर्गत येणारे मांढरदेव गडावर अमावस्या पोर्णिमेला मांढरदेवीच्या दर्शनाकरीता मोठया प्रमाणावर भाविकांची वर्दळ राहते. भाविकांच्या वर्दळीचा फायदा घेवून काही महिला व पुरुष मोबाईल, पर्स चोरी करतात. अशा प्रकारच्या चोर्या करणार्या महिला व पुरुष यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबतच्या सूचना वाई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्यांना दिलेल्या होत्या.
दि.13 डिसेंबर अमावस्याच्या अगोदरचा रविवार हा देवीचा वार असल्याने मोठया प्रमाणावर दर्शनाकरीता भाविकांची वर्दळ राहणार होती. त्यावेळी पाकिटमारीचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी व महिला कर्मचारी यांनी साध्या वेशात मांढरदेव गडावर भाविकांच्या गर्दीत गस्त करुन व वॉच ठेवून चोरी करण्याच्या हेतून मांढरदवे गडावर भाविकांच्या गर्दीत फिरणारे 6 महिलांना ताब्यात घेवून त्याच्यावर सी.आर.सी.सी.109 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे. सदर कारवाईमुळे मांढरदेव गडावर घडणारे पाकिटमारीचे गुन्हांना आळा बसला असून मांढरदेव ट्रस्ट व ग्रामस्थांनी पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईत वाई उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार,पो. कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, म.पो.कॉ.ज्ञानेयवरी भोसले, सुप्रिया सापते यांनी सहभाग घेतला होता.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |