08:54pm | Oct 25, 2021 |
सातारा : सहा-सहा वर्ष एका पोलीस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल होऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी? असा प्रश्न गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु, असा जणू इशाराच दिला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपुर्वी सातारा पोलीस आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी करीत असलेले कामकाज या विषयी उदयनराजेंनी पत्रकार परिषदेतून पोलीस दलाच्या कामकाजाविषयी शंका व्यक्त केली होती. दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बहुधा उदयनराजेंनी मांडलेल्या शंकेची शहनिशा करण्यासाठी आज पोलीस ठाणे गाठले.
आज सकाळी अचानक गृहराज्यमंत्री देसाई दुचाकीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिस ठाण्यात कोणकोण उपस्थित आहेत? कामकाज कसे सुरु आहे? पोलिसांचा तपास कसा सुरु आहे? प्रलंबित गुन्ह्यांचा तपास कुठ अडला आहे? याची सरबत्ती करत गृहराज्यमंत्र्यांनी पोलिस ठाणे फैलावर घेतले. जे अधिकारी उपस्थित नाहीत त्यांना तात्काळ बोलावण्यात आले.
सुरुवातीला पोलिस ठाण्याची पाहणी करत असताना ज्या पोलिसांच्या डोक्यावर टोपी नाही त्यांना खडेबोल सुनावले. अंगावर वर्दी असताना डोक्यावर टोपी घालण्याची ताकीद पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात अधिकारी किती, कर्मचारी संख्या किती याची माहिती घेतली. अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना तात्काळ बोलावण्यात आले. याचवेळी क्राईमची माहिती घेत किती गुन्हे पेंडीग आहेत? तपास अर्ध्यावर किती प्रकरणांचा आहे? याची माहिती घेतली.
पेलिस ठाण्याचे कारभारी पोनि भगवान निंबाळकर पोलिस ठाण्यात आल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांनी ‘सातारा शहर पोलिस ठाणे गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत’ असल्याचा जाब विचारताच पोलिसांचे तत पप झाले. दीड महिन्यांपूर्वी सातार्यातील बाळू खंदारे राडा प्रकरणाला हात घालत ‘क्रिमीनल रेकॉर्ड असणारा गंभीर गुन्ह्यातील संशयित गुन्हेगार का सापडत नाही?’ या गुन्ह्याचे तपासी अधिकारी कोण आहेत? असा सवाल केला. यावेळी तपासी अधिकारी पोनि वंदना श्रीसुंदर यांनी तपासामध्ये मुख्य संशयित आरोपी वगळता इतरांना अटक केली असल्याचा खुलासा केला. तसेच सरकार पक्षाने न्यायालयात अटी, शर्थीवर जामीन देण्यास सांगितल्याने इतर संशयितांना जामीन झाल्याचे श्रीसुंदर यांनी सांगितले.
यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, विधी न्याय विभागाकडून त्याबाबत माहिती घेतली जाईल. मात्र मुख्य संशयित आरोपी अजून का पकडला गेला नाही? शहर पोलिसांचे असेच काम चालत राहिले तर मला अॅक्शन घ्यावी लागेल. ही शेवटची संधी आहे. न्यायालयातून याबाबत वेगळी माहिती समोर आली तर खंदारे प्रकरणात तपासी अधिकार्याची चौकशी केली जाणार. येत्या 15 दिवसात सातारा शहरातील कायदा,सुव्यवस्था कडक झाली पाहिजे. अन्यथा, शहर पोलिसांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांनाही विविध सूचना दिल्या.
एसडीपीओ आंचल दलाल यांच्याबाबतही ना.शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला. गृहराज्यमंत्री वेळोवेळी शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्या आतापर्यंत एकदाही इथे आलेल्या नाहीत. तसेच त्या रस्त्यावरही कधी दिसत नाहीत. त्या ऑन ड्युटी आहेत की नाहीत? त्या रजेवर आहेत का? याची काही माहिती नसते. आता लगेच त्यांचे लोकेशन घ्या, वायरलेसवर विचारा. दलाल यांचे असे काम चालणार नाही. ‘दिस इज नॉट फेअर’ असा निरोप त्यांना कळवण्यास सांगण्यात आले.
वायसी कॉलेज परिसरात असलेल्या निर्भया चौकीचा कारभार संशयास्पद असल्याची माहिती गृहराज्यमंत्री यांना देण्यात आली. याठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी गुंडांचे, गुंडांच्या मुलांचे वाढदिवस चौकीतच केक कापून फोटोशूट करत आहेत. चौकीतीलच पोलिसांची ‘चमकोगिरी’ होत असून त्यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी झालेल्या तक्रारीत सुरुवातीला अरेरावीची भाषा वापरल्याचे सांगण्यात आले. याबाबत जो फोन झाला आहे त्याचे रेकॉर्डिंग समोर आले तर पोलिसाने वापरलेल्या भाषेजी पोलखोल होईल, अशी माहिती देण्यात आली. यावर लवकरच ‘निर्भया चौकीची झाडाझडती घेतली जाईल,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री यांनी दिली. दरम्यान मंत्री देसाई यांनी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली असता नियुक्त कर्मचार्यास व्यवस्थित सांगता न आल्याने देसाईंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान, सुमारे एक तासभर पोलिसांची झाडाझडती झाल्याने पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडाली.
देसाई म्हणाले खंदारेवर गुन्हा दाखल असल्याचे माहिती नाही. एका पोलीस ठाण्यात सहा वर्ष राहून देखील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराची माहिती देऊ शकत नाही कर्मचारी. अधिकारी सांगतात १८ गुन्हे पोलीस कर्मचारी सांगतात १२ गुन्हे, सहा गुन्हे लपविण्याचे कारण काय? असे देसाई यांनी म्हणताच अधिकारी यांनी संबंधित विषय सावरुन घेत ते सहा गुन्हे प्रतिबंधात्मक विषयाचे असल्याचे सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |