फलटण : दीड एकर जमीन प्रकरणी निंबळक, ता.फलटण येथील माजी सैनिक पत्नी श्रीमती प्रभावती बाबुराव ढमाळ यांनी खाजगी सावकारी विरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात श्रीमती प्रभावती ढमाळ यांनी नमूद केले आहे की, श्रीमती प्रभावती ढमाळ यांना सोरायसीस हा त्वचेचा आजार असून औषधोपचारासाठी त्यांनी नवनाथ सदाशिव राणे या खाजगी सावकाराकडून दि.4 फेब्रुवारी 2014 रोजी 25 हजार, त्यांनतर सून सौ.निलम ढमाळ यांना पॅरालिसिसचा ऍटॅक आल्याने पुन्हा औषधोचारासाठी दि. 21 ऑगस्ट 2014 रोजी 50 हजार आणि दि.2 मार्च 2015 रोजी रानातल्या पाईपलाईनच्या कामासाठी 1 लाख 35 हजार असे एकूण 2 लाख 10 हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने मला तुमच्याकडून 32 लाख रुपये येणे आहे असे सांगून तुमची साडे तीन एकर जमीन माझ्याकडे मुदत खरेदीने द्या, असे सांगून मुदत खरेदीसाठी नेले. परंतु प्रत्यक्षात शब्दांत फसवणूक करुन ती जमीन कायम खूषखरेदीने त्याचे वडील सदाशिव अर्जून राणे यांच्या नावावर करुन घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर श्रीमती ढमाळ यांनी हरकत घेतली असता तुम्ही पैसे दिल्यावर जमीन परत फिरवून देतो, असे नवनाथ राणे यानी सांगितले.
यानंतर श्रीमती ढमाळ व त्यांचे कुटूंबीय वारंवार नवनाथ राणे यांना रक्कम देण्यास गेल्यावर त्यानी 32 लाख रुपये परत दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर श्रीमती ढमाळ यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर राणे याने तीन एकरापैकी दीड एकर जमीन श्रीमती ढमाळ यांच्या सुनेच्या सौ.निलम विनायक ढमाळ यांच्या नावावर फिरवून दिली. त्यानंतर वारंवार पैशासाठी नवनाथ राणे आम्हाला मारहाण करुन आमचा छळ करत असल्याचे, श्रीमती ढमाळ यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबतची तक्रार फलटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |