11:03pm | Sep 22, 2020 |
सातारा : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन सुरू करून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सक्तीच्या वसुली विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातही मायक्रो फायनान्स कंपन्यांसह दादागिरी करत खाजगी सावकारी बोकाळली आहे. त्याला अटकाव करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्ह्यात हेल्पलाइन सुरू करून सक्तीच्या वसुलीविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास सक्तीने वसुली करत बोकाळलेली दादागिरी मोडीत काढण्यास मदत होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच, ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
सध्याच्या कोव्हीड -१९ महामारीच्या अनुषंगाने केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाउन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी आढळून येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबतीत रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांसह खासगी सावकारी फार मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. गोरगरीब गोरगरीब जनतेला व्याजाने पैसे देऊन नंतर त्यांची लूट करत वसुलीसाठी दादागिरी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. संबंधित वसुलीसाठी दहशतीचा वापर करत असल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या, खाजगी सावकारी यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या आहेत मात्र त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. याबाबत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनाही अनेकांनी निवेदने दिली आहेत. मात्र त्यावर म्हणावी अशी कार्यवाही होत नसल्यामुळे शेखर सिंह यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातही हेल्पलाईन सुरू करून सक्तीची वसुली करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागले आहे. सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कोरोना निराकरणासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र, देश आणि जगात सुरू आहे. त्यामुळे याही परिस्थितीत शेखर सिंह यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात ठोस निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यात मॅग फायनान्स विरोधात तक्रारी वाढल्या
जिल्ह्यातील फलटण येथे मुख्यालय असलेल्या मॅग फायनान्स विरोधात तक्रारी वाढल्या असून, सुमारे वर्षभरापूर्वी तालुक्यातील एका व्यक्तीने मॅग फायनान्समधून एक दुचाकी फायनान्सवर घेतली होती. केवळ दोन हप्ते थकले असताना मॅग फायनान्सच्या रेपो बॉईजनी संबंधीताची गाडी ओडून नेली होती. सुमारे वर्षभरानंतर संबंधित व्यक्तीला मॅग फायनान्सच्या वकिलाची नोटीस आली असून या नोटीसीद्वारे गाडीची थकीत रक्कम सुमारे सव्वा लाख रुपये भरा अन्यथा तुमच्यावर न्यायालयात खटला दाखल करणे केला जाईल, अशी धमकी देण्यात आले आहे. गाडी घेताना भरलेली एक चतुर्थांश रक्कम तसेच गाडीचे न भरलेले हप्ते, वकिलाने पाठवलेली सव्वा लाख रुपये भरण्याची नोटीस त्यामुळे मॅग फायनान्सने गाडी ताब्यात घेऊनही संबंधित ग्राहकाकडून सुमारे दोन लाखाची वसुली करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गाडी पन्नास हजाराची वसुली मात्र दोन लाखांची त्यामुळे ही पठाणी वसुली नाही तर दुसरी काय असा प्रश्नही संबंधित ग्राहकाने केलेला आहे.
फलटण तालुक्यात मॅग फायनाने गेल्या काही वर्षांपासून उच्छाद मांडला आहे. दादागिरीच्या जोरावर ऐन लॉकडाऊन मध्येही मॅग फायनान्स कंपनीने जबरदस्तीने वसुली केली आहे. मॅग फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे तालुक्यातील महिला वर्गही दहशतीखाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मॅग फायनान्सच्या अवैध वसुलीवर चाप लावून मॅग फायनान्स कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी रिझर्व बॅंकेकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही फलटण तालुक्यातून होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |