01:24pm | Jul 04, 2020 |
सातारा : राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये अत्यावश्यक सेवेतील निधी तातडीने देण्यात येत आहे. त्यात कोणतीही अडचण नाही असं छातीठोकपणे सांगितले होते. पण सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वाहनचालकांना गेली तीन महिन्यांपासून वेतन मिळत नव्हते. अखेर शनिवारी या कंत्राटी वाहन चालकांना दोन महिन्याचे वेतनाचे दर्शन झाले. तर एक महिन्याचे वेतन रखडविण्यात आले. याबाबत वरिष्ठ पातळीवर जाब विचारण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्याकडे काही वाहन चालकांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली होती. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 62 कंत्राटी वाहनचालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवर 24 तास काम करावे लागते. परंतु त्यांना तीन महिने वेतन मिळाले नाही. अशा खंत व्यक्त केली होती. याबाबत आरोग्य विभाग व संबंधित अधिकार्यांविरोधात आंदोलन करण्याची भूमिका भाजपाच्या वतीने घेण्यात येणार होती. तत्पूर्वीच प्रकरण चिघळू नये याची जाणीव ठेवून संबंधित ठेकेदाराने जुळवाजुळव करून काल शनिवारी जिल्हा परिषदेच्या पाठीमागे एका झाडाखाली प्रत्येक वाहन चालकाला चार हजार रूपयांप्रमाणे दोन महिन्याचे 8 हजार वेतन दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहन चालकांना चांगलाच दिलासा मिळाला असला तरी एक महिन्याचे 4 हजार रूपयाचे वेतन त्वरीत न दिल्यास भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश उबाळे यांनी दिला आहे.
सातारा जिल्हयातील आरोग्य विभाग हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. गेली तीन महिने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवर वाहन चालक असणार्या ग्रामीण भागातील लोकांना जगणे मुश्कील झाले होते. 2003 साली कायमस्वरूपी असणार्या काही वाहनचालकांच्या चुकीमुळे मंत्रालयातील सचिव पातळीवर कंत्राटी पध्दतीने वाहन चालक नेमण्याची पध्दत सुरू झाली. 2013 साली कंत्राटी वाहनचालकांना मानधन किंवा वेतन ने देता त्यांचा खर्च हा कार्यालयीन खर्चामध्ये समाविष्ठ करण्यात आला होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे काही वाहनचालक हे चार हजार वेतनावरच काम करत आहेत. सरासरी 140 रूपये रोजंदारीवर वाहन चालक काम करत असून या पेक्षा त्यांनी गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम केले तर त्यांना 500 रूपये हजेरी मिळाली असती. याची जाणीव ठेवून संबंधित विभागाने खासगी वाहन चालकांना किमान दरमहा 15 हजार वेतन करावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भरत जाधव, सुभाष जाधव व अशोक निंबाळकर यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |