04:24pm | Feb 19, 2021 |
सातारा: डफळवाडी (ता.पाटण) येथील अपप्रवृत्त वृत्तीचे लोक आमच्या कुटुंबातील महिलांन शिवीगाळ करून मारहाण करून पाण्याच्या पाईपची मोडतोड केली आहे. आम्ही वापरत असलेले पाणी बेकायदेशीररित्या त्यांच्या शेतात वळवले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही तफळवाडी येथील शेतात लोकशाही मार्गाने साखळी उपोषण सुरू केले आहे. आम्हाला येत्या आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा डफळवाडी येथील राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजेंद्र शिंदे पुढे म्हणाले, आमचे डफळवाडी येथे 24 हेक्टर 10 आर जमीन क्षेत्र आहे. त्यापैकी काही जमीन शेतीसाठी वापरत आहोत. त्यामध्ये तीन ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. त्यातील एका झर्याचे पाणी गावातील लोक पिण्यासाठी व शेतीसाठी वापरतात. उर्वरित एका झर्याचे पाणी आमच्या वयक्तिक शेतीसाठी वापरत आहोत. 2013 मध्ये आम्ही वापरत असलेल्या पाण्याला गावातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून अडथळा निर्माण करण्यात आल्यामुळे आम्ही न्यायालयाकडे दाद मागितली. निकाल आमच्यासारखाच दिला गेला. दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी गावातील काही जणांनी आमच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ, मारहाण करून आमच्या पाण्याच्या पाईपांची मोडतोउ केली. तसेच आम्ही वापरत असलेले पाणी त्यांच्या शेतात वळवले. या घटनेची तक्रार पाटण पोलिस ठाण्यात गेलो असता तेथे आम्ही दमदाटी व अरेरावीची भाषा वापरली.
संबंधितांनी पाणी अडविल्याने आमच्या शेतीचे नुकसान होवून आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत निवेदन देवून अथवा तक्रार करून कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्ही दि.8 फेब्रुवारी 2021 पासून डफळवाडी येथील आमच्या शेतात लोकशाही मार्गाने उपोषण सुरू केले आहे. येत्या आठ दिवसांत आम्हाला न्याय न मिळाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला धुळाराम जगन्नाथ शिंदे, रामचंद्र धुळाराम शिंदे, पूजा धुळाराम शिंदे, यशोदाबापू शिंदे, उमेश कोंडिबा शिंदे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |