01:50pm | Jul 11, 2020 |
मुंबई: कोरोना विरोधातील लढाईत बाकी सर्व पर्याय अपयशी ठरल्याने राज्यात पुन्हा एकदा बहुतांश ठिकाणी ‘मिशन लॉकडाऊन’ला सुरूवात होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संकटापासून मुक्ती मिळेल अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ लागला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनने देशासह राज्यांची आर्थिक परिस्थिती खालावत असताना राज्यात बहुतांशी ठिकाणी घेतल्या जाणार्या या निर्णयामुळे आर्थिक घडी सावरण्यापूर्वीच विस्कटणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे.
राज्यात सध्या असे असेल ‘मिशन लॉकडाऊन’
औरंगाबादेत शुक्रवारपासून 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा प्रारंभ झाला. प्रशासनाने बहुतांश दुकाने आणि सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याची घोषणा केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.
सोलापूर : शहरात लॉकडाऊन होणार आहे. शनिवारी दुपारी अंतिम निर्णय होईल. लोकांना 5 दिवस अगोदर कळवले जाईल.
नांदेड : जिल्ह्यात 12 जुलैपासून आठवडाभर लॉकडाऊन असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहतील.
कल्याण-डोंबिवली : येथील लॉकडाऊनही 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
ठाणे : 19 जुलैपर्यंत संचारबंदी
ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहता लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड : 10 दिवस लॉक
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 10 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. येथे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |