05:22pm | Jan 09, 2021 |
कराड : महिला व युवतींमध्ये स्तनाच्या कर्करोगाबरोबरच अन्य कर्करोगांच्या कारणांची मिमांसा व्हावी, त्याबाबत जागरूकता व सजगता निर्माण होतानाच या गंभीर आजाराची लक्षणे, त्यासंदर्भात आधी व नंतर घ्यावयाची काळजी याबद्दलची विशेष माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळण्यासाठी येत्या दि. 16 जानेवारीला स्तनाच्या कर्करोगासंदर्भात जनजागरण करण्यासाठी राज्यस्तरीय ‘द टच अप’ रेट्रो द गोल्डन एरा’ हा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुण्याचे अभिजीत जोशी मेमोरिअल फाऊंडेशन, मिडास टच हेअर अॅण्ड ब्युटी इन्स्टीट्युट, सिंफनी इव्हेन्ट्स 9, (कै.) खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थांतर्फे हा भव्य कार्यक्रम कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित करण्यात आला आहे. त्यात ‘मधुबाला ते माधुरी दीक्षित’ पर्यंतची कोणतीही रंगभूषा आणि केशभूषा करून त्यांची कला सादर करण्याची संधी या स्पर्धेचे खास आकर्षण आहे. तसेच, महिला पत्रकारांचा सत्कार, कर्करोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात होणार आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. उपस्थित महिलांना सवलतीच्या दरात कर्करोग विषयक तपासणीची कूपन्स दिली जाणार आहे.
अशा या भरगच्च कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, इंचलकरंजी, इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्याातील मान्यवर महिला यामध्ये सहभागी होणार आहेत. तरी, जास्तीत जास्त महिला व युवतींनी या स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ.सुनीता मोरे, मिडास टच हेअर अॅण्ड ब्युटी इन्स्टीट्युटच्या अंजली जोशी, अभिजीत जोशी मेमोरिअल फाउंडेशनच्या नीतु कुमार व अथर्व जोशी, सिंफनी इव्हेन्ट्स 9 चे संदीप पाटील या संयोजक समितीने केले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |