सातारा : राज्य पातळीवर राष्ट्रवादीतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी आज विधान परिषद सदस्यपदाची शपथ घेतली. "मी शशिकांत जयवंतराव शिंदे शपथ घेतो की…" अशी त्यांनी शपथ घेताच सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस व आ. शशिकांत शिंदेच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शशिकांत शिंदे तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके, रमेश कराड, अमोल मिटकरी व राजेश राठोड यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 11 मे रोजी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एकूण नऊ जागांपैकी महाविकास आघाडीतर्फे पाच व भाजपतर्फे चार अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. विधान परिषदेचे निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी परवाच विधान परिषदेच्या नऊ सदस्यांना नियुक्तीपत्रे दिली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी शपथविधीची फक्त औपचारिकता बाकी होती.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. सातारा जिल्हा राष्ट्रवादीला यामुळे मोठा हादरा बसला होता. त्यामुळेच शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेवून त्यांना मंत्रीपदही देण्यात येणार असल्याच्या चर्चा वर्षापासून सुरु होत्या. मात्र योग्यवेळी शशिकांत शिंदेंचे पुनर्वसन केले जाईल, असा शब्दही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी दिला होता. अखेर पवारांनी सातारकरांना दिलेला शब्द पाळत शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीतून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली होती. शेवटी आज आ. शिंदे यांनी "मी शशिकांत जयवंतराव शिंदे शपथ घेतो की…" अशी शपथ घेताच जिल्ह्यातील राष्ट्रवादीजन सुखावले आहेत. खा. शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला आहे. आ. शिंदे यांची जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री झाल्याने येत्या काळात कोरगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सत्ता संघर्ष पेटणार आहे.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |